Maharashtra Lockdown 2021 : लॉकडाऊनमुळे ४,५०० डबेवाल्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, राज्य सरकारकडे मदतीची विनवणी

Dabbawalas facing tough time due to fresh covid restrictions in maharashtra lockdown 2021

Maharashtra Lockdown 2021 : देशातील एकूण कोरोना संसर्गापैकी महाराष्ट्रातील आकडेवारी सर्वात जास्त चिंताजनक आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. यादरम्यान शासनाने कडक निर्बंधही लादले आहेत. लॉकडाऊनसदृश्य या निर्बंधांमुळे अनेक व्यापारी, हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. मुंबईत चाकरमान्यांचे अन्नदूत असलेल्या डबेवाल्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. एकूण 5 हजार डबेवाल्यांपैकी केवळ 200 ते 250 कार्यरत असून उर्वरित डबेवाल्यांचा रोजगार गेला आहे. Dabbawalas facing tough time due to fresh covid restrictions in maharashtra lockdown 2021


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातील एकूण कोरोना संसर्गापैकी महाराष्ट्रातील आकडेवारी सर्वात जास्त चिंताजनक आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. यादरम्यान शासनाने कडक निर्बंधही लादले आहेत. लॉकडाऊनसदृश्य या निर्बंधांमुळे अनेक व्यापारी, हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. मुंबईत चाकरमान्यांचे अन्नदूत असलेल्या डबेवाल्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. एकूण 5 हजार डबेवाल्यांपैकी केवळ 200 ते 250 कार्यरत असून उर्वरित डबेवाल्यांचा रोजगार गेला आहे.

कडक संचारबंदीमुळे अनेक खासगी कार्यालये बंद असून काही ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरू आहे. यामुळे याचा थेट परिणाम चाकरमान्यांना डबे पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांवर झाला आहे. डबेच बंद झाल्याने अनेक डबेवाल्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना मुंबई डबावाला असोसिएशनचे प्रवक्ते विष्णू कलडोके म्हणाले, “5000 डबेवाल्यांपैकी फक्त 400-500 कार्यरत होते. नवीन लॉकडाऊनच्या कडक निर्बंधानंतर आता फक्त 200-250 शिल्लक आहेत. आर्थिक मदतीसाठी आम्ही पुन्हा सरकारला विनंती करत आहोत.”

राज्य सरकारने हा मिनी लॉकडाऊन जाहीर करतानाच हातावर पोट असणाऱ्या फेरीवाले, रिक्षावाल्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. परंतु राज्य सरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अनेक तळागाळातील घटकांना कोणतीही आर्थिक मदत मिळणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आता डबेवाल्यांच्या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dabbawalas facing tough time due to fresh covid restrictions in maharashtra lockdown 2021

महत्त्वाच्याा बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी