बीबीसीच्या नव्या डॉक्ट्युमेंट्रीमुळे वाद : प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांच्यावरील माहितीपटावर ब्रिटीश राजघराण्याचा आक्षेप


ब्रिटनच्या राजघराण्याने प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांना प्रसारमाध्यमांसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर बेतलेल्या बीबीसीच्या नव्या डॉक्युमेंट्रीवर आक्षेप घेतला आहे. राजघराण्याने आक्षेप घेत अज्ञात स्त्रोतांच्या वापराविरोधात मंगळवारी एक संयुक्त निवेदन जारी केले. या निवेदनात बीबीसीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला असून लोकशाहीसाठी स्वतंत्र आणि मुक्त पत्रकारिता असणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. Controversy erupts over new BBC documentary: British royal family objects to documentary on Prince William and Prince Harry


वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनच्या राजघराण्याने प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांना प्रसारमाध्यमांसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर बेतलेल्या बीबीसीच्या नव्या डॉक्युमेंट्रीवर आक्षेप घेतला आहे. राजघराण्याने आक्षेप घेत अज्ञात स्त्रोतांच्या वापराविरोधात मंगळवारी एक संयुक्त निवेदन जारी केले. या निवेदनात बीबीसीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला असून लोकशाहीसाठी स्वतंत्र आणि मुक्त पत्रकारिता असणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा बकिंगहॅम पॅलेस, त्यांचा मुलगा आणि उत्तराधिकारी प्रिन्स चार्ल्सचे क्लेरेन्स हाऊस आणि प्रिन्स विल्यमचे केन्सिंग्टन पॅलेस कार्यालयांनी सोमवारी प्रसारित झालेल्या ‘द प्रिन्सेस अँड द प्रेस’ या दोन भागांच्या माहितीपटावर एक निवेदन जारी केले. ब्रिटनच्या राजघराण्याकडून एका डॉक्युमेंट्रीला आलेली अशी प्रतिक्रिया खूपच चकित करणारी आहे.राजघराण्याचे संयुक्त निवेदन

भारतीय वंशाचे बीबीसी पत्रकार अमोल राजन यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात राजघराण्यातील सूत्रे पडद्यामागून पत्रकारांशी बोलत असल्याचे संकेत देतो. संयुक्त निवेदनात म्हटले आहे, “स्वतंत्र, जबाबदार आणि मुक्त पत्रकारिता निरोगी लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे.”

या माहितीपटाचे वर्णन ‘आधुनिक राजेशाही इतिहासातील सर्वात नाट्यमय कालखंडा’ची कथा सांगणारे आहे. विल्यम (ड्यूक ऑफ केंब्रिज) आणि हॅरी (ड्यूक ऑफ ससेक्स) हे भाऊ अलीकडच्या वर्षांत मीडियाशी कसे वागले याचे वर्णन यात करण्यात आले आहे. प्रिन्स हॅरीची माजी प्रेयसी चेल्सी डेव्ही यांना डेटिंग करत असताना पाळत ठेवल्याबद्दल खासगी हेर गॅविन बरोजने शोमध्ये माफी मागितली. बरोज यांनी कार्यक्रमात सांगितले की, जेव्हा त्यांनी 2000 मध्ये तत्कालीन ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ टॅब्लॉइडसाठी काम करण्यास सुरुवात केली तेव्हा प्रिन्स विल्यमपेक्षा प्रिन्स हॅरीबद्दल लोकांमध्ये खूप जास्त रस होता.

Controversy erupts over new BBC documentary: British royal family objects to documentary on Prince William and Prince Harry

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण