उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोनावर उपाययोजनेसाठी गावोगावी दौरै करत आहेत. सगळ्या जिल्ह्यांना भेटी देत आहेत. मात्र, त्यांची बदनामी करण्यासाठी कॉँग्रेसकडून खोटे व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत. मीरत येथे एका ज्येष्ठाने योगींचा रस्ता अडवून त्यांना परत जाण्यास सांगितल्याचा खोटा व्हिडीओ कॉँग्रेसकडून पसरविण्यात आला. याप्रकरणी कॉँग्रेसच्या एका नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Congress False videography, edited video shows seniors blocked Yogi Adityanath’s path
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोनावर उपाययोजनेसाठी गावोगावी दौरै करत आहेत. सगळ्या जिल्ह्यांना भेटी देत आहेत. मात्र, त्यांची बदनामी करण्यासाठी कॉँग्रेसकडून खोटे व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत.
मीरत येथे एका ज्येष्ठाने योगींचा रस्ता अडवून त्यांना परत जाण्यास सांगितल्याचा खोटा व्हिडीओ कॉँग्रेसकडून पसरविण्यात आला. याप्रकरणी कॉँग्रेसच्या एका नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील मीरत जिल्ह्यात योगी आदित्यनाथ यांनी दौरा केला. यावेळी बिजौली या गावात ते गेले असता एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांचा रस्ता अडविला. आम्हाला तुमची गरज नाही असे म्हणत त्यांच्या रस्त्यात मध्ये बाज टाकली.
त्यांना गावात प्रवेश करून दिला नाही असा खोटा व्हिडीओ केला. पश्चिम उत्तर प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष ओमवीर यादव यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ टाकला. हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले की आता मुख्यमंत्र्यांना गावकरी गावात प्रवेशही देत नाहीत.
मुख्यंमत्री आम्हाला तुमची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा विनंती करूनही त्यांना गावात प्रवेश करून दिला नाही असेही म्हटले होते. पोलीसांनी हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी खरखौदा पोलीस ठाण्यात ओमवीर यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App