महिलांना ४० टक्के नोकऱ्या ; अनेक सवलती , उत्तर प्रदेशसाठी काँग्रेसचा जाहीरनामा


विशेष प्रतिनिधी

लखनौ – उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पक्षाचा महिलांसाठीचा ‘शक्ती विधान’ हा जाहीरनामा प्रकाशित केला. राज्यात २० लाख नवीन रोजगार तयार करण्याचे उद्दिष्ट काँग्रेसने ठेवले असून, यातील ४० टक्के रोजगार महिलांसाठी राखीव ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.Congress declares manifesto for UP

या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी प्रियांका गांधी म्हणाल्या, की उत्तर प्रदेशात महिला कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत वाढविणाऱ्या उद्योगांना करसवलती व इतर सहाय्य केले जाईल. त्याचप्रमाणे, सार्वजनिक वाहतुकीतील चालकासारख्या पुरषकेंद्रित क्षेत्रातही आरक्षणाच्या सध्याच्या तरतुदीनुसार महिलांना ४० टक्के जागा राखीव ठेवल्या जातील.



महिलांना चालक होण्यासाठी केवळ महिलांसाठीची प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील, असेही त्यांनी नमूद केले.उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिलांना ४० टक्के जागा देण्याची घोषणाही काँग्रेसने यापूर्वी केली होती.

Congress declares manifesto for UP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!