पंकजा मुंडे यांचे समर्थकांना भावनिक पत्र, विशेष संकल्प करणार असल्याची माहिती


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपाचे नेते आणि आपले वडील गोपानाथ मुंडे यांच्या १२ डिसेंबरच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून एक भाविनक पत्र लिहिलं आहे. या दिवशी त्या संकल्प करणार असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. शिवाय, आपल्या समर्थकांना देखील त्या हा संकल्प कराल का? असे त्यांनी म्हटले आहे.Emotional letter from Pankaja Munde’s to supporters

पंकजा मुंडे यांनी ट्विट केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, १२ डिसेंबर, ३ जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतोय याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांनाच जातं! तुमच्या एवढं सच्च, अनोखं नातं माज्या जीवनात कोणतही नाही. प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो.



सामुदायीक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग-दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी अनेक कार्यक्रम आपण केले. अनेक मान्यवर अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती सर्व गडावर आले. अनेक दु:खी कुटुंबियांना मदत केली. अनेक रुग्णांचे इलाज झाले.

खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मूळी, हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील, सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघषार्ची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात.

कोणत्याही नात्याविना इतकं प्रेक कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यायवर असे म्हणत पंकजा मुंडे यांनी समर्थकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, नात्याविना प्रेम, माया,आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणाºया नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे, गुरू, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं! या १२ डिसेंबरला एक संकल्प घ्यावा म्हणते ऐकाल का? सोपा आणि साधा संकल्प कराल का साध्य?

Emotional letter from Pankaja Munde’s to supporters

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात