आरक्षण संरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचे सरकारने फक्त ढोंग केले ; आघाडी सरकारच्या कारभारावर पंकजा मुंडे यांची टीका

पुढे पंकजा मुंडें म्हणाल्या की सत्तेत असणारे लोक अनुभवी आहेत.ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले हा निर्णय म्हणजे ओबीसींना अंधारात ढकलणे. The government only pretended to issue ordinances to protect reservations; Pankaja Munde’s criticism of the alliance government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आज मंगळवारी (ता.२३) मुंबईत भाजप मुख्यालयात पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अजय सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.पंकजा मुंडे म्हणाल्या की ,तुमच्या महाराष्ट्रात काय चाललयं असं, लोक मला विचारतात.पुढे पंकजा मुंडें म्हणाल्या की सत्तेत असणारे लोक अनुभवी आहेत.ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले हा निर्णय म्हणजे ओबीसींना अंधारात ढकलणे.तसेच इम्पेरिकल डेटाची मागणी न्यायालयाकडून सातत्याने होत आहे. परंतु सरकारकडून हा डाटा न्यायालयाला दिला जात नाही.

प्रत्येक गोष्ट, निर्णय यासाठी केंद्राकडे बोट दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. आपल्याला इम्पेरिकल डेटाची व्याख्या माहीत आहे का?, असा सवाल पंकजा यांनी राज्य सरकारला विचारला आहे.नेमकी या सरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचे का? का नुसत आरक्षण संरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचे ढोंग सरकारने केले आहे.

The government only pretended to issue ordinances to protect reservations; Pankaja Munde’s criticism of the alliance government

महत्त्वाच्या बातम्या