गोरगरीबांचे घराचे स्वप्न आणखी सोपे, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला २०२४ पर्यंत मुदतवाढ


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गोरगरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला आणखी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.Poor people’s dream of a house is even easier, extension of Pradhan Mantri Grameen Awas Yojana till 2024

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही 2024 पर्यंत सुरू राहणारआहे. योजने अंतर्गत 2024 पर्यंत 2.95 कोटी जनतेला घरकूलचा लाभ दिला जाणार आहे. नोव्हेंबर 2021 पर्यंत 1.65 कोटी लाभार्थ्यांना घरकूलाचा लाभ मिळला आहे.प्रधानमंत्री घरकूल योजने अंतर्गत मार्च 2021 पर्यंत 1.97 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यातील 1.44 लाख कोटी केंद्र सरकारने खर्च केले आहे. आता प्रधानमंत्री आवास योजनेचा कालावधी वाढवण्यात आला असून, त्यासाठी 2,17,257 कोटी रुपयांच्या निधीला अधिकची मंजुरी दिली आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा मुळ उद्देश ज्यांना राहण्यासाठी घर नाही, त्यांना स्वत:च्या हक्काचे घर देण्यासाठी ही योजना आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना या योजने अंतर्गत घरकूल प्रदान करण्यात येते, त्यासाठी सुमारे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते.

Poor people’s dream of a house is even easier, extension of Pradhan Mantri Grameen Awas Yojana till 2024

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती