मनी मॅटर्स : इमर्जन्सी फंड हा खरं तर असतो वैयक्तिक अर्थसंकल्पच….


कोरोनासारख्या सध्याच्या विपरीत परिस्थीतीत आपत्कालीन निधीचे महत्व सर्वांनाच उमगले आहे. इमर्जन्सी फंड हा वैयक्तिक अर्थसंकल्प असतो जो भविष्यातील दुर्घटना किंवा अनपेक्षित खर्चासाठी आर्थिक सुरक्षा राखीव म्हणून ठेवला जाते. म्हणजे भविष्यात कोणताही अनपेक्षित खर्च उभा राहिला तर अशा खर्चासाठी जमा करून ठेवलेली ही तजवीज असते.Emergency Fund is actually a personal budget

आर्थिक नियोजन करतानाची सर्वात आधीची नियोजन करताना खालील वैयक्तिक उद्देश्यांचे खालील क्रमाने प्राधान्य देणे आवश्यक आहे. विमा म्हणजेच जीवन विमा हा टर्म इन्शुरन्सच असावा. त्यांनतर आरोग्य विमा काढावा. त्यानंतर इमर्जन्सी फंड बाजूला ठेवावा.

त्यानंतर मग रिटायरमेंट प्लॅंनिंग, मुलांचा शैक्षणिक खर्च, स्वतः साठी पहिले घर, भविष्यात येणारा मोठा खर्च जसे की मुलांचे शिक्षण, लग्न आदी. इतर इच्छा आकांक्षा जसे की चारचाकी मोटार, परदेश सहल, दौरा आदी. अर्थातच जसे जसे आपले उत्पन्न वाढत जाते तसे तसे आपण ह्या उद्देश्यांसाठी वर दिलेल्या क्रमाने गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

पण बऱ्याच वेळी हे पाहावयास मिळते की हा क्रम उलटा अवलंबला जातो जसे की इच्छा आकांक्षांपासून सुरवात होऊन रिटायरमेंट प्लॅंनिंग, इमर्जन्सी फंड, आणि विमा ह्यास शेवटचे प्राधान्य दिले जाते. भविष्यात येणारे धोके आपणास माहित नसतात आणि त्यासाठी इमर्जन्सी फंड आणि विमा हे अत्यंत महत्वाचे असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे संकटकाळात तुम्ही सहजपणे तरून जावू शकता.

Emergency Fund is actually a personal budget

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात