‘सीडब्ल्यूसीच्या बैठकीत सोनिया-राहुल गांधींसमोर सरदार पटेल यांचा अपमान, काश्मीरबाबत गोंधळाचे वातावरण’, भाजपचा आरोप

Congress committed a sin by humiliating Sardar Patel in CWC meeting says BJP

CWC meeting : भारतीय जनता पक्षाने सोमवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यावर काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक शनिवारी झाली. माध्यमांच्या वृत्तांचा हवाला देत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रश्न केला की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी सरदार पटेलांविरोधी वक्तव्य करणाऱ्या तारिक हमीद कर्रा यांना फटकारतील का? Congress committed a sin by humiliating Sardar Patel in CWC meeting says BJP


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने सोमवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यावर काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक शनिवारी झाली. माध्यमांच्या वृत्तांचा हवाला देत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रश्न केला की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी सरदार पटेलांविरोधी वक्तव्य करणाऱ्या तारिक हमीद कर्रा यांना फटकारतील का?

संबित पात्रा म्हणाले, ‘आपल्या सर्वांना माहिती आहे की काँग्रेस हा फक्त एकाच कुटुंबाचा पक्ष आहे. नेहरू-गांधी कुटुंबाचा वारसा पुढे कसा चालवायचा आणि चाटुकारितेची पराकाष्ठा कशी टिकवायची, हे काँग्रेसचे ध्येय आहे. आज वृत्तपत्रांमध्ये हे प्रसिद्ध झाले आहे की, दोन दिवसांपूर्वी झालेल्या CWC बैठकीत काश्मीर संदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. काश्मीरसंदर्भात बैठकीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जवाहरलाल नेहरूंनी जम्मू -काश्मीरला भारतामध्ये सामील केल्याचेही म्हटले होते.

ते म्हणाले, ‘बैठकीत असेही म्हणण्यात आले होते की, सरदार पटेल यांनी या संपूर्ण उद्देशाने जिना यांची भेट घेतली होती आणि पटेल जिना यांच्यासह काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही म्हटले होते. आज हे स्पष्ट झाले आहे की नेहरू-गांधी राजघराण्याच्या कुटुंबाच्या वारशाचला वर ठेवण्यासाठी, मग ते सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, सरदार पटेल असोत, तुम्ही कोणालाही अपमानित करावे लागले तरी करतील. काँग्रेस पक्ष सर्व काही करू शकतो. जेव्हा सरदार पटेल यांच्याबद्दल अशा गोष्टी सांगितल्या जात होत्या, जे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत, तेव्हा बैठकीत उपस्थित असलेल्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अशा गोष्टी बोलू नयेत असे म्हटले होते का?

भाजप नेते पुढे म्हणाले, “ते (तारिक हमीद कर्रा) स्वतः जम्मू -काश्मीरचे आहेत आणि राहुल गांधी यांना पुढील काँग्रेस अध्यक्ष म्हणून बसवणे हे त्यांचे एकमेव ध्येय आहे. त्यामुळे त्यांनी गांधी कुटुंबाचा गौरव केला. एका कुटुंबाने सर्व काही केले आणि दुसऱ्याने पूर्णपणे काहीच केले नाही. काँग्रेसची अशी मानसिकता कशी असू शकते? पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) चे माजी नेते कर्रा यांनी 2017 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचे सदस्य कर्रा हे CWCचे सदस्य म्हणून नामांकित झालेले काश्मीर खोऱ्यातील पहिले नेते आहेत.

Congress committed a sin by humiliating Sardar Patel in CWC meeting says BJP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात