Congress Always With Black Marketers And Hoarders Says Bjp Mp Meenakshi Lekhi on Navnneet Kalara Raid

वैद्यकीय उपकरणांचा काळा बाजार करणाऱ्या नवनीत कालरांचा काँग्रेसशी थेट संबंध, भाजप खा. मीनाक्षी लेखींचा आरोप

Bjp Mp Meenakshi Lekhi : देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आहे, दुसरीकडे कोरोनाशी संबंधित वैद्यकीय उपकरणांच्या काळ्या बाजारावर राजकारणाने वेग घेतला आहे. नवनीत कालरा यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त करण्यात आल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता भाजप खासदार मीनाक्षी लेखींनी काँग्रेसवर गंभीर आरोपे केले आहेत. Congress Always With Black Marketers And Hoarders Says Bjp Mp Meenakshi Lekhi on Navnneet Kalara Raid


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आहे, दुसरीकडे कोरोनाशी संबंधित वैद्यकीय उपकरणांच्या काळ्या बाजारावर राजकारणाने वेग घेतला आहे. नवनीत कालरा यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त करण्यात आल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता भाजप खासदार मीनाक्षी लेखींनी काँग्रेसवर गंभीर आरोपे केले आहेत.

मीनाक्षी लेखींनी काँग्रेसवर आरोप करत म्हटले की, काँग्रेसचा हात नेहमी काळा बाजार करणारे आणि साठेबाजांच्या मागे राहिलेला आहे. नवनीत कालराचे काँग्रेसशी थेट संबंध आहेत. नवनीत कालरांकडे 7500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जप्त करण्यात आले. यांची किंमत 13 कोटी रुपये आहे. या प्रकरणात मॅट्रिक्स सेल्युरचे सीईओ गौरव खन्नाही सामील आहेत.

भाजप खा. मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, राहुल गांधी आणि त्यांचे काँग्रेसचे मित्रच आधी ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून गोंधळ घालतात आणि नंतर याच लोकांकडून उपकरणे जप्त होतात. त्यांनी काँग्रेसवर आरोप केला की, नवनीत कालरा यांचा काँग्रेसशी थेट संबंध आहे. त्या पुढे म्हणाल्या की, जर तुम्ही नवनीत कालरांचे फेसबुक प्रोफाइल पाहिले तर त्यात ते महामारीसाठी पंतप्रधानांना दोष देताना दिसत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, त्यांच्या रेस्तराँचे शेफ राहुल गांधी आणि सोनिया गांधींसोबत फोटो काढतात आणि त्यांना आपला परिवार मानतात. याशिवाय मीनाक्षी लेखी असेही म्हणाल्या की, जेव्हा अजय माकन शहर विकास मंत्री होते, तेव्हा त्यांनी 2004 ते 05 मध्ये दिल्ली गोल्फ कोर्स नॉमिनेशन रॉबर्ट वाड्रा आणि 2005-06 मध्ये नवनीत कालरा यांना दिले होते.

Congress Always With Black Marketers And Hoarders Says Bjp Mp Meenakshi Lekhi on Navnneet Kalara Raid

महत्त्वाच्या बातम्या