कुठलीही जाहिरात बाजी न करता मदत करणाऱ्या कलाकारांना कृपया ट्रोल करु नका ; अभिनेता सिद्धार्थ जाधवची विनंती


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : कोरोना महामारीमध्ये सर्वच भरभरून मदत करत आहेत .कुणी जाहिरपणे मदतीसाठी पुढाकार घेत आहे तर कुणी शांततेत गुप्तपणे कुठलाही गाजावाजा न करता मदत करत आहे .अशा बिकट परिस्थितीत मराठी कलाकार मोठ्या प्रमाणावर लोकांची मदत करत आहेत. कुठलीही जाहिरात बाजी न करता मदत करणाऱ्या या कलाकारांना कृपया ट्रोल करु नका अशी विनंती मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवनं केली आहे.sidharth jadhavs special request to trollers please stop trolling to marathi actors

सिद्धार्थनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं मराठी कलाकारांची बाजू भक्कमपणे मांडली. तो म्हणाला, “गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजसृष्टीतील अनेक तरुणांचा करोनामुळे मृत्यू झाला. सुमित्रा भावे, अभिलाषा पाटील, किशोर नांदलस्कर असे ज्येष्ठ कलाकारांना आपण करोनामुळे गमावले आहेत. हे सर्व ऐकून खूप वाईट वाटतं. मराठीसृष्टीतील अनेक कलाकार या करोनाच्या लढ्यात शक्य तेवढी मदत करत आहेत. प्रवीण तरडे, संदीप पाठक, प्रिया बेर्डे, तेजस्विनी पंडीत यांच्यासारखे अनेक कलाकार गावोगावी जाऊन लोकांना मदत करत आहेत. रक्तदानापासून अन्न धान्यापर्यंत विविध प्रकारची मदत केली जात आहे.

परंतु तरी देखील लोक केवळ हिंदी कलाकारांचच अधिक कौतुक करतायेत. अर्थात आम्ही याबाबत कुठलीही जाहिरातबाजी करत नाही किंवा तक्रारही नाही. पण मराठी कलाकार काहीच करत नाहीयेत अशी कृपया तक्रार करु नका. त्यांच्या मदतीवर शंका उपस्थित करु नका.” अशी विनंती सिद्धार्थनं केली आहे.

sidharth jadhavs special request to trollers please stop trolling to marathi actors

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण