पीएम मोदींची कोरोनावर हायलेव्हल मीटिंग, राज्यांना रुग्णसंख्या पारदर्शक ठेवण्याचे, व्हेंटिलेटरच्या योग्य वापराचे निर्देश

PM Modi High Level Meeting On Covid 19, Vaccination, Corona Cases In India

PM Modi High Level Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. यात पंतप्रधान कार्यालयाव्यतिरिक्त विविध मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी खेड्यांमध्ये सर्वत्र सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यासाठी घरोघरी जाण्यास सांगितले आहे. याशिवाय व्हेंटिलेटरचा वापर होत नसल्याबद्दलही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच बैठकीत त्यांनी राज्यांनी कोरोनाची आकडेवारी पारदर्शकपणे नोंदवण्यासही सांगितले. PM Modi High Level Meeting On Covid 19, Vaccination, Corona Cases In India


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. यात पंतप्रधान कार्यालयाव्यतिरिक्त विविध मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी खेड्यांमध्ये सर्वत्र सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यासाठी घरोघरी जाण्यास सांगितले आहे. याशिवाय व्हेंटिलेटरचा वापर होत नसल्याबद्दलही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांची हाय-लेव्हल मीटिंग

कोरोना आणि देशातील लसीकरणाच्या स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. देशातील कोरोनाच्या सद्य:स्थितीबद्दल अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. मार्चच्या सुरुवातीस सुमारे 50 लाख चाचण्यांपासून आता दर आठवड्याला सुमारे 13 दशलक्ष चाचण्या करण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधानांना सांगण्यात आले. हळूहळू कमी होत चाललेला चाचणी सकारात्मकता दर आणि वाढत असलेला रिकव्हरी रेट याबद्दलही त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. आरोग्य कर्मचारी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नांच्या परिणामामुळे आता रुग्णसंख्या कमी होत असल्याची चर्चा झाली.

बैठकीत अधिकाऱ्यांनी कोरोनाची राज्य व जिल्हा पातळीवरील स्थिती, चाचणी, ऑक्सिजनची उपलब्धता, आरोग्य पायाभूत सुविधा, लसीकरणाचा रोडमॅप याविषयी सविस्तर सादरीकरण केले.

कोरोना आकडेवारीची पारदर्शकपणे नोंदवा…

पंतप्रधान म्हणाले की, लोकल कंट्रोल स्ट्रॅटेजी ही काळाची गरज आहे, खासकरून ज्या जिल्ह्यांमध्ये टीपीआर जास्त आहे. आरटी-पीसीआर आणि वेगवान चाचण्यांचा वापर करून चाचणीत आणखी वाढ करण्यात यावी, खासकरून उच्च चाचणी सकारात्मकतेचे प्रमाण असलेल्या भागात व्हावी. पंतप्रधान म्हणाले की, राज्यांना त्यांच्या प्रयत्नांवर प्रतिकूल प्रभाव होईल असे वाटू न देता रुग्णसंख्या व इतरआकडेवारी पारदर्शक पद्धतीने नोंदवली पाहिजे. भलेही ती जास्त का असेना.

घरोघरी जाऊन चाचणी व देखरेखीसाठी सूचना

पंतप्रधानांनी ग्रामीण भागात आरोग्य संसाधने वाढवून घरबसल्या तपासणी व देखरेखीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. तसेच आशा व अंगणवाडी सेविकांना सर्व आवश्यक उपकरणांसह सक्षम करण्याबद्दल सांगितले. पंतप्रधानांनी सुलभ भाषेत मार्गदर्शक सूचनांसोबतच ग्रामीण भागात घरगुती विलगीकरण आणि उपचार उपलब्ध करण्यास सांगितले.

ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठ्याचे निर्देश

पंतप्रधानांनी निर्देश दिले की, ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एक वितरण योजना तयार केली जावी, ज्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचीही तरतूद असावी. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, अशा उपकरणांच्या संचालनात आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण प्रदान केले जावे. अशा वैद्यकीय उपकरणांच्या सुयोग्य संचालनासाठी विजेचा पुरवठा सुनिश्चित केला पाहिजे.

राज्यांकडून व्हेंटिलेटरचा योग्य वापर नाही

काही राज्यांमध्ये व्हेंटिलेटरचा योग्यप्रकारे वापर होत नसल्याच्या काही बातम्यांना पंतप्रधानांनी गांभीर्याने घेतले आणि केंद्र सरकारने पुरविल्या गेलेल्या व्हेंटिलेटरच्या स्थापनेचे व संचालनाचे त्वरित ऑडिट करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधान म्हणाले की, आवश्यक असल्यास आरोग्य कर्मचार्‍यांना व्हेंटिलेटर व्यवस्थित चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे.

पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाविरुद्धच्या भारताच्या लढाईला शास्त्रज्ञ व विषय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले असून त्यांचे मार्गदर्शन कायम राहील. लसीकरण प्रक्रिया आणि 45+ लोकसंख्येच्या राज्यनिहाय व्याप्तीविषयी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. भविष्यात लस उपलब्ध होण्याच्या रोडमॅपवरही चर्चा करण्यात आली. लसीकरणाला गती देण्यासाठी राज्यांनी अधिकाधिक लक्षपूर्वक काम करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

PM Modi High Level Meeting On Covid 19, Vaccination, Corona Cases In India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात