विशेष प्रतिनिधी
गोपालगंज : बिहारमध्ये यायचे असल्यास तुम्हाला सक्तीची दारूबंदी पाळावीच लागणार आहे. बाहेरून येणाऱ्यांनाही दारूबंदीतून सूट मिळणार नसल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. बाहेरून येणारांना दारू बंदीतून सूट मिळावी, ही मागणी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी फेटाळून लावली.Coming to Bihar, we will have to abide by the ban on alcohol, clarified Chief Minister Nitish Kumar
वैद्यकीय आधारावर लोकांना दारू बंदीतून सूट दिली जाण्याचा प्रस्तावही पूर्णपणे नाकारत लोकांंनी दारू पिऊन आरोग्य बिघडवून घेतले असून, त्यांना दारू पिण्यापासून रोखण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
बिहारमध्ये एप्रिल २०१६ पासून दारूबंदी लागू करण्यात आलेली आहे. राज्यव्यापी सामाजिक सुधारणा मोहिमेत उत्तर बिहारच्या या जिल्ह्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी एका सभेत सांगितले की, दारूबंदी कायद्याबरोबरच बालविवाह व हुंडा प्रथाही रोखली पाहिजे. मी दारूबंदी केल्यामुळे मोठ्या संख्येने लोक माझ्यावर नाराज आहेत.
ते म्हणतात की, किमान बाहेरून आलेल्यांना तरी सूट द्या. मी त्यांना विचारतो की, बिहारमध्ये लोक दारू पिण्यासाठी येतात का? दिवाळीच्या कालावधीत बिहारमध्ये भेसळयुक्त दारू पिल्यामुळे अनेक जिल्ह्यांत ४० पेक्षा अधिक लोक मरण पावले आहेत. एकट्या गोपालगंजमध्येच १० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App