अफगाणिस्तानच्या राजकारणात चीनचा शिरकाव, तालिबानी गटांशी चर्चा केली सुरु


विशेष प्रतिनिधी

बीजिंग – अफगाणिस्तानमधून अमेरिकेची सैन्यमाघारी होत असताना चीन आणि अफगाणिस्तानची जवळीक वाढत आहे. तालिबान संघटनेच्या एका गटाने चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची येथे भेट घेतली.China taking interst in Afgan politics

मुल्ला अब्दुल घनी बरादर याच्या नेतृत्वाखालील या गटाने, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणालाही करू दिला जाणार नाही, असे आश्वाीसन चीनला दिले. बरादर याने चीनला ‘विश्वा सू मित्र’ असेही संबोधले आहे.अफगाणिस्तान सरकारमध्ये पुढील काळात तालिबानचे वर्चस्व असणार हे स्पष्ट असून आताही देशातील निम्म्याहून अधिक जिल्हे त्यांच्याच ताब्यात आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानी गटाचा हा चीन दौरा झाला आहे. चीनमधील शिनजिआंग प्रांतात उइगर मुस्लिमांमध्ये सरकारबद्दल असंतोष आहे.

या समुदायातील ईस्ट तुर्कमेनिस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ईटीआयएम) फुटीरतावादी गट अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा ओलांडण्याची शक्यता चीनने व्यक्त केली आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या भूमीचा इतरांना वापर करू दिला जाणार नाही, असे आश्वाीसन तालिबानने वँग यी यांना दिले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महंमद कुरेशी यांनी तीन दिवसांपूर्वी वँग यी यांची भेट घेत, अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई करण्याची घोषणा केली होती.

China taking interst in Afgan politics

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण