विशेष प्रतिनिधी
चेन्नई : चीनच्या कच्छपि लागून डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटना भारतीय उद्योगांमध्ये अशांतता निर्मा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चेन्नईतील फॉक्सकॉनचा प्रकल्प बंद पाडण्यासाठी या संघटना आंदोलन करत असल्याचे गुप्तचर विभागाचय अहवालात म्हटले आहे.China provokes leftist ideology workers union , unrest in control industry, agitation to expose Foxconn
चेन्नईतील प्रचंड मोठ्या अशा फॉक्सकॉनच्या प्रकल्पात विषबाधेच्या घटनेनंतर कामगारांनी निषेध म्हणून प्रकल्प बंद पाडला होता. परंतु, गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार चीनच्या चिथावणीने डाव्या विचारांकडे झुकलेले कामगार आंदोलन करत आहेत.
गुप्तचरांचय अहवालात म्हटले आहे की कॅन्टीनच्या निकृष्ट अन्नामुळे काही कर्मचाºयांचे आरोग्य बिघडल्याचा आरोप करत कामगारांनी आंदोलन केले. मात्र, यामागे चीनचा भारतीय उद्योगांना अस्थिर करण्याचा डाव आहे. फॉक्सकॉनने भारतात उद्योग उभारल्यामुळे चीन नाराज आहे.
याचे कारण आत्तापर्यंत फॉक्सकॉनचे ४८ टक्के उत्पादन चीनमध्ये होत होते. त्यामुळे भारतातील उद्योग बंद पाडण्यासाठी चीन कोणत्याही थरावर जात आहे. त्याला भारतातील डाव्या कामगार संघटना सहकार्य करत आहेत.चीन आणि अमेरिकेतील वादांमुळे चीनने उपकरणांवर शुल्क लादण्याची धमकी दिली आहे.
त्यामुळे अॅपल या कंपनीने भारतातील उत्पादकांसमवेत अनेक करार केले आहेत. अॅपलसोबतच इतर जागतिक कंपन्याही भारतामध्ये आपल्या उत्पादनांसाठी पर्याय शोधत आहेत. त्यामुळे चीनची पुरवठा साखळी विस्कलित होत आहे.
भारतातील तैवानी कंपन्यांच्या यादीत कर्नाटकातील नरसापुरा येथील विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग आणि चेन्नईजवळील महिंद्रा सिटी येथील पेगाट्रॉन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची नावे आहेत. प्रकल्पस्थली झालेले हल्ले आणि हिंसाचाराच्या आरोपामुळे विस्ट्रॉनने आपले काम थांबविले आहे.
गुप्तचरांच्या अहवालात म्हटले आहे की डाव्या कामगार संघटनांना हाताशी धरून भारतात येणाºया परदेशी कारखान्यांमध्ये अशांतता निर्माण करण्याचे चीनचे प्रयत्न आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व न्यू डेमोक्रॅटिक लेबर फ्रंट, पीपल्स डेमोक्रॅटिक युथ असोसिएशन, पीपल्स राइट्स प्रोटेक्शन सेंटर आणि स्टुडंट्स अप्रिझिंग मूव्हमेंट यांनी केले होते.
तमिळनाडू सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनातील या चळवळींचा सहभाग, तसेच भारताबाहेरील हालचालींशी त्यांचा संबंध तपासला जात आहे. सीपीआय(एम) चे राज्य सचिव के कांगराज यांनी फॉक्सकॉन सुविधेतील आंदोलनात चीनचा हात असण्याची शक्यता फेटाळून लावली, ते म्हणाले, उत्पादन सुविधेतील अनुचित कामगार पद्धती लपविण्यासाठी हे कारण देण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App