LAC वर चीनची लष्करी कवायत, सैन्यप्रमुख नरवणे म्हणाले, सीमेवर एकतर्फी बदलास परवानगी नाही, हवाई दलाच्या प्रमुखांनीही घेतला आढावा

China Army Drill on LAC, Army Chief Narwane Said Unilateral Changes Are Not Allowed On The Border, Air Force Chief Also Review Leh situation

China Army Drill on LAC : एलएसीवर चीनची लष्करी कवायत सुरू आहे, यादरम्यान भारतीय लष्कराच्या आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी इशारा दिला आहे. लष्कर प्रमुख नरवणे यांनी सीमेवर सैन्याच्या सद्य:स्थितीची माहिती दिली, हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांनीही लडाख सीमेला भेट दिली आहे. China Army Drill on LAC, Army Chief Narwane Said Unilateral Changes Are Not Allowed On The Border, Air Force Chief Also Review Leh situation


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एलएसीवर चीनची लष्करी कवायत सुरू आहे, यादरम्यान भारतीय लष्कराच्या आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी इशारा दिला आहे. लष्कर प्रमुख नरवणे यांनी सीमेवर सैन्याच्या सद्य:स्थितीची माहिती दिली, हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांनीही लडाख सीमेला भेट दिली आहे.

लष्करप्रमुख म्हणाले की, भारत आपल्या सीमेवर कधीही एकतर्फी बदल होऊ देणार नाही. त्याचबरोबर एप्रिल 2020 पर्यंत दोन्ही सैन्यांची स्थिती कायम राखण्याचा आमचा प्रयत्न असेल. नरवणे यांनी हे स्पष्ट केले की, भारताच्या उत्तरेकडील सीमेवरील महत्त्वाच्या भागात आमच्या जवानांचे नियंत्रण कायम आहे.

ते पुढे म्हणाले की, पूर्व लडाखमध्ये आमचे सैन्य चीनबरोबर ठामपणे आणि कोणत्याही ताणतणावाशिवाय मोर्चेबांधणीवर व्यग्र आहे. आपल्याकडे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुरेसे बळ आहेत. लष्करप्रमुख म्हणाले की, भारताची स्थिती स्पष्ट आहे की, सर्व विवादित मुद्द्यांवरून सैन्य मागे घेण्यापूर्वी तणाव कमी केला जाऊ शकत नाही.

हवाई दलाच्या प्रमुखांनीही तयारीचा आढावा घेतला

दरम्यान, एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया शुक्रवारी लेह येथे दाखल झाले आणि चीन सीमेवरील लष्करी भागाला भेट दिली. भदोरिया यांनी येथे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी सुरक्षाविषयक चर्चा केली आणि सैनिकांना प्रोत्साहनही दिले. लेह आणि कारगिल जिल्ह्यात हवाई दलाची कार्यरत सज्जता पाहून हवाई दलाच्या प्रमुखांनी सुरक्षा परिस्थितीवर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

China Army Drill on LAC, Army Chief Narwane Said Unilateral Changes Are Not Allowed On The Border, Air Force Chief Also Review Leh situation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात