दिल्लीत एम्समध्ये लहान मुलांचे लसीकरण सुरू, कोव्हॅक्सिन लसीची होणार चाचणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनावरील स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मुलांवरील चाचण्यांना आजपासून प्रारंभ झाला. एम्समध्ये वय वर्षे २ ते १८ दरम्यानच्या मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. पाटण्यातील एम्समध्ये देखील मुलांवरील लसीच्या चाचण्यांना सुरूवात झाली आहे. Child vaccination begins in delhi

भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेली ही लस लहान मुलांवर प्रभावी आहे की नाही हे पडताळून पाहण्यात येत आहे. पूर्णपणे सुदृढ अशा ५२५ मुलांना लसी देण्यात आल्या आहेत. या मुलांच्या आधी कोरोना चाचण्या घेऊनच त्यांना ही लस देण्यात आली आहे.सध्या १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनावरील लस दिली जात आहे. मात्र लहान मुलांना अजून ती दिली जात नाही. त्यामुळ मुलांना कोरोना हण्याची शक्यता कायम आहे. तिसऱ्या लाटेत मुलांनाच कोरोना होण्याची भिती वर्तविली जाते. त्यामुळे या चाचण्यांना कमालीचे महत्व आहे. या चाचण्या यशस्वी झाल्या तर भारतात कोट्यवधी मुलांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या चाचण्यांकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे.

Child vaccination begins in delhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती