विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचे वेगवान कार्यशैलीवरून कौतुक केले आहे. ‘‘ते सचिन तेंडुलकरप्रमाणे असून ते एकामागून एक विक्रम मोडत आहेत, ’’ अशा शब्दांत गवई यांनी सरन्यायाधीश रमणा यांच्या वेगवान कार्यशैलीबद्धल गौरवोद्गार काढले. Chief justice Ramna work fast like sachin Tendulkar
बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांचे आभार मानण्यासाठी आयोजित सोहळ्यात न्यायाधीश गवई बोलत होते. ते म्हणाले की, सरन्यायाधीश रमणा हे टीम लिडर असून ते भारतीय न्यायव्यवस्थेचे सच्चे मार्गदर्शक आहेत. ते सर्व न्यायाधीश सहकाऱ्यांना आपल्या भावाप्रमाणे मानतात आणि ते एक खरोखरच महनीय व्यक्ती आहेत.
न्यायाधीश विनीत सरन म्हणाले की, सरन्यायाधीश रमणा हे अदभूत व्यक्तिमत्त्व आहे. एकाचवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधीशांची नियुक्तीची शिफारस करणे हे एक मोठे पाऊल आहे. सरन्यायधीशांकडून देशातील वेगवेगळ्या उच्च न्यायालयात ६८ न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची शिफारस करणे हे देखील महत्त्वाचे पाऊल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App