१ ऑगस्टपासून होणार हे महत्त्वाचे बदल, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम, काय होणार महाग, काय होणार स्वस्त? वाचा सविस्तर…


आयसीआयसीआय बँक आणि रिझर्व्ह बँक त्यांचे नियम बदलणार आहेत.  याशिवाय 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅसचे नवीन दर ही जाहीर केले जातील, याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : 1ऑगस्टपासून आपल्या जीवनशैलीशी निगडित नियमांमध्ये बदल होणार आहेत.  आयसीआयसीआय बँक आणि रिझर्व्ह बँक त्यांचे नियम बदलणार आहेत.  याशिवाय 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅसचे नवीन दर ही जाहीर केले जातील, याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. Changes in the rules related to your life will take place from 1st August;  It will have a direct effect on the general public

  १ ऑगस्टपासून पुढील नियम बदलणार

*आयसीआयसीआय बँके नियम बदलणार आहे. ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. 1 ऑगस्टपासून बरेच मोठे बदल करणार आहे.  1 ऑगस्टपासून बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला रक्कम मोजावी लागणार आहे. यासह चेक बुकचे नियमही बदलणार आहेत.  आयसीआयसीआय आपल्या ग्राहकांना 4 ट्रांजेक्शनची फ्री सेवा देत.



आयसीआयसीआय बँक सेव्हिंग खातेधारकांना दरमहा 4 ट्रांजेक्शन मोफत देते.  मोफत मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारावर आता 150 रुपये चार्ज द्यावे लागतील.

  •  ऑगस्टपासून आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना शाखेतून एक लाख रुपयापर्यंतची रोख रक्कम काढता येणार आहे.
  •  तसेच इतर व्यवहारासाठी 1000 रुपयांना 5 रु चार्ज पडणार आहे.
  •   शाखेव्यतिरिक्त इतर शाखांमधून पैसे काढण्यासाठी 25,000 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.
  •  या व्यतिरिक्त जर तुम्ही 1000 रुपये काढले तरीही  5 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे.

 *चेक बुकवर चार्ज आकारला जाणार

एक चेकबुक फ्री मिळणार आहे.
या चेकबुक नंतर ग्राहकांना आणखी चेक बुकसाठी      20 रुपये द्यावे लागणार आहेत.

  *ऑगस्टपासून बँकेला सुट्टी असली तरी देखील खातेधारकांचा पगार जमा होणार आहे. 

2021 पासून, रविवार किंवा इतर कोणत्याही बँकेला सुट्टी असली तरीही, आपला पगार, पेन्शन, लाभांश आणि व्याज देय थांबणार नाही, म्हणजेच पगार आणि पेन्शनची रक्कम ही बँकेच्या सुट्टी दिवशी देखील ग्राहकांना मिळणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जाहीर केले आहे की राष्ट्रीय स्वयंचलित क्लियरिंग हाऊस (नाच) आठवड्याचे सातही दिवस ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल.  वेतन, पेन्शन, व्याज, लाभांश इत्यादी मोठ्या प्रमाणात देयके देण्याचे काम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारा संचालित केले जाते.  1 ऑगस्टपासून कंपन्यांना NACH च्या 7 दिवस 24 तास सुविधेमुळे कंपन्यांना आपल्या कामगारांचा पगार कधीही जमा करता येणार आहे.

 *गॅसचे नवीन दर जाहीर केले जातील

1 ऑगस्टपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल होणार आहेत.  घरगुती एलपीजी आणि कमर्शियल सिलिंडर्सचे नवीन दर हे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केले जातात.

Changes in the rules related to your life will take place from 1st August;  It will have a direct effect on the general public

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात