केंद्र सरकारची तांदळाच्या निर्यातीला बंदी : नियोजित निर्यातीला 15 सप्टेंबरपर्यंत मुभा; कमी पावसाने भातक्षेत्र घटले, टंचाईचा धोका


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशांतर्गत तांदळाची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. विदेशी व्यापार महानिर्देशालयाच्या वतीने याबाबत नुकतेच अधिसूचना जाहीर केली. तर 9 सप्टेंबरपासून हा नियम लागू करण्यात आलेला आहे. दरम्यान, पूर्वी ज्यांनी तांदूळ निर्यातीचे नियोजन केलेले आहे. अशा व्यापाऱ्यांना मात्र, या नवीन नियमातून 15 सप्टेंबर पर्यंत मुभा देण्यात आलेली आहे. ते 15 सप्टेंबरपर्यंत तांदूळ पाठवू शकतात. दरम्यान, बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के सीमाशुल्क लागू झाल्यानंतर हा निर्णय शासनाने घेतला आहे.Central government’s ban on rice exports: Scheduled exports allowed till September 15; Low rains reduce paddy area, risk of shortage

डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) यांच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ” तुकडा तांदळाच्या निर्यातीची श्रेणी ‘मुक्त’ वरून ‘प्रतिबंधित’ करण्यात आली आहे. हा नियम 9 सप्टेंबरपासून हा नियम लागू होईल. निर्यात धोरणाच्या संदर्भात विदेशी व्यापार धोरण 2015-2020 अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदी या अधिसूचनेला लागू होणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच, 9 ते 15 सप्टेंबर या कालावधीत तांदळाच्या काही मालाची निर्यात करण्यात परवानगी दिली जाणार आहे. या कालावधीत ज्यांच्या शिपमेंट्स या अधिसूचनेपूर्वी जहाजांवर सुरू झाल्या आहेत. अशाच खेपांना निर्यातीसाठी परवानगी दिली जाणार आहे.



बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्काची आकारणी

सरकारने उसना तांदूळ वगळता बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लावले होते. चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. महसूल विभागाने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तांदूळ आणि तपकीरी तांदूळावर 20 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. हे निर्यात शुल्क 9 सप्टेंबरपासून लागू होणार आहे

कमी पावसामुळे भातशेतीचे क्षेत्र घटले, म्हणून घेतला निर्णय

तुकडा तांदळावर निर्यात बंदी घालण्याचा निर्णय घेण्याआधी हे लक्षात घेणे गरजेचे आहे. देशातील काही राज्यांमध्ये कमी पावसामुळे भातशेतीचे क्षेत्र घटले आहे. चीननंतर भारत हा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ओळखला जातो. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला. त्यात 39.4 लाख टन बासमती तांदूळ होता. अधिकृत आकडेवारीनुसार, या कालावधीत गैर-बासमती तांदळाची निर्यात $6.11 अब्ज होती. भारताने 2021-22 मध्ये जगातील 150 हून अधिक देशांमध्ये बिगर बासमती तांदूळ निर्यात केला.

Central government’s ban on rice exports: Scheduled exports allowed till September 15; Low rains reduce paddy area, risk of shortage

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात