द्रौपदी मुर्मू : एकीकडे पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याचा आनंदोत्सव; दुसरीकडे सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस रस्त्यावर!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : संपूर्ण देशभर आज राजकीय दृष्ट्या परस्पर विसंगत वातावरण आहे. एकीकडे द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाल्यावरून देशभरातील तब्बल 1.25 ते 1.50 लाख आदिवासी गावांमध्ये प्रचंड उत्साहाचा आणि उत्सवाचा माहोल आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड केस मध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी चौकशीच्या मुद्द्यावरून संपूर्ण काँग्रेस संतापाने मोदी सरकार विरोधात रस्त्यावर आली आहे. देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. Celebrating the first tribal woman President

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यावर मात करून ऐतिहासिक यश मिळवले आहे. या यशाचा उत्सव देशभरातील 1.25 ते 1.50 लाख आदिवासी गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आदिवासी गावे, तालुके, शहरे परंपरागत पद्धतीने सजली आहेत. करोडो आदिवासी आपल्या परंपरागत वाद्यांसह नृत्य करताना दिसत आहेत. द्रौपदी मुर्मू यांचे जन्मराज्य ओरिसामध्ये सणाचे वातावरण आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सायंकाळी दिल्लीमध्ये मोठा रोड शो करून द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाचा विजय साजरा करणार आहेत.

एकीकडे हा उत्साही आणि उत्सवी माहोल असताना दुसरीकडे सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड केस मध्ये ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू आहे. या चौकशी विरोधात काँग्रेसचे सर्व नेते दिल्लीत एकवटले आहेत. रस्त्यारस्त्यांवर मोठे प्रदर्शन करत आहेत. राज्यांच्या राजधान्यांमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात उतरले आहेत. केंद्रातल्या मोदी सरकारचा काँग्रेस आपली सर्व ताकद पणाला लावून विरोध करत आहे. पोलिसांनी दिल्लीतील रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून काँग्रेसजनांचा मोर्चा आडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले आहेत. काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांचा संघर्ष झाला आहे. सोनिया राहुल आणि प्रियांका गांधी सध्या ईडीच्या मुख्यालयात आहेत.

Celebrating the first tribal woman President

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात