वृत्तसंस्था
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून एआयएमआयएमबरोबर आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु पंजाबमध्ये पक्ष आघाडी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. BSP to contest elections on its own in Uttar Pradesh, Uttarakhand : Mayawati’s announcement मायावती यांनी रविवारी सकाळी सोशल मीडियावर ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात बसपा आणि असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएम यांच्यात आघाडी होऊ शकते , ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
सतीश चद्र मिश्रा मीडिया समन्वयक
मायावतींनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, ओवैसी यांचा एआयएमआयएम आणि बसपा एकत्रितपणे यूपीमधील आगामी विधानसभा निवडणुका लढवणार आहेत, ही बातमी पूर्णपणे खोटी, दिशाभूल करणारी आणि तथ्यहीन आहे. यासह त्यांनी सतीशचंद्र मिश्रा यांना बसपा मीडिया सेलचे राष्ट्रीय समन्वयक बनविल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या देताना बसपाची बाजू नक्की घ्या
बहुजन समाज पक्षाबद्दल बातमी लिहिण्यापूर्वी, दाखवण्यापूर्वी किंवा प्रकाशित करण्यापूर्वी त्यांनी सतीशचंद्र मिश्राकडून योग्य माहिती घ्यावी. पक्षाची बाजू असणे महत्वाचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. मायावती आणि अखिलेश २०१९ मध्ये उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी बसपा एकत्र आले.पण बहुजन समाज पार्टी आणि सपा (समाजवादी पार्टी) आघाडीच्या निवडणुकीतील पराभवानंतर मायावतींनी समाजवादी पक्षाला जबाबदार धरले होते. यानंतरच आघाडी तुटली.
गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमने एकत्र निवडणूक लढविली होती. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती की, उत्तर प्रदेशात एआयएमआयएम आणि बसपा एकत्र येऊ शकतात. पण,मायावती यांनीच आता तशी कोणतीही आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App