नाशिकचे माजी शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचे निधन; शिक्षण क्षेत्राची मोठी हानी

विशेष प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक श्री नारायण शंकर तथा तथा नानासाहेब गर्गे (९१) यांचे निधन झाले. द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांनी नानासाहेब यांची नियुक्ती नाशिक शहर संघचालक म्हणून केल्यावर त्यांनी पंचवीस वर्षे ती जबाबदारी सांभाळली होती. करसल्लागार व्यावसायिक म्हणून त्यांचे चांगले नाव होते. Death of Nanasaheb Garge



लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ व दीपक मंडळ यांच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. त्याकाळात पंचवटीतील तरुण ऐक्य मंडळाकडून खेळणारे ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. मध्यवर्ती हिंदू सैनिकी संस्था (भोसला मिलिटरी स्कूल) च्या व्यवस्थापनात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्यामागे त्यांचे पुत्र करसल्लागार नितीन व उद्योजक निलेश तसेच तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Death of Nanasaheb Garge

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात