वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ‘पिनाका’ रॉकेटची शुक्रवारी यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये ही चाचणी घेतली. सलग २५ रॉकेट सोडले गेले आणि ते लक्ष्य भेदण्यात यशस्वी ठरले. ४५ किमीपर्यंत टार्गेट उद्धवस्त करण्यात यशस्वी ठरले आहे.DRDO successfully test fires Enhanced Pinaka Rocket
पुण्यातील अर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅबिलिशमेंटन आणि हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरटरीने ही रॉकेट यंत्रणा विकसित केली आहे. त्यासाठी नागपूरच्या इकॉनॉमिक एक्सप्लॉझिव्हने उत्पादनासाठी सहकार्य केले आहे.
पिनाका रॉकेटची लाँचिंग यंत्रणा ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार केली आहे. पिनाका डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑफ डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑरगायनेझशन ही एलअँडटीच्या मालकीची आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आर्टिलरी रॉकेट सिस्टममध्ये अपडेट सुरु ठेवलं होतं.
२४आणि २५ जून रोजी मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर (एमबीआरएल) द्वारे विकसित केलेल्या या पिनाका विस्तारित रेंजच्या रॉकेटची यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह डीआरडीओचं अभिनंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी या मोहिमेत सहभागी सर्वाचं कौतुक केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App