करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने ब्रिटनची उडाली झोप


विशेष प्रतिनिधी

लंडन : तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने ब्रिटनची झोप उडाली आहे. तिसरी लाट हिवाळ्यात येण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करावे लागेल, असे चित्र आहे. ब्रिटनमध्ये सर्व थरात तिसऱ्या लाटेबाबत भीती व्यक्त केली जात आहे. शास्त्रज्ञांनी यासंदर्भात इशारे दिले असून हिवाळ्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट येऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. Briton can face third wave of corona



झिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील यंदाचा हिवाळा अडचणीचा राहू शकतो. वर्षाअखेरीस मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा अधिक होऊ शकते. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक आहे. परंतु पुढच्या वर्षी देशाची स्थिती सामान्य राहू शकते आणि बाजार पूर्ववत होऊ शकतो. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ब्रिटनमध्ये लसीकरण मोहीम काही प्रमाणात सुस्त पडलेली असताना युवकांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या ४६.६ टक्के नागरिकांना लस देण्यात आली असून १८ ते २० वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरवात झाली आहे. लशीवरुन युवकांत उत्साह असून लसीकरण केंद्रावर लांब रांगा दिसत आहेत.

Briton can face third wave of corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात