देशातील ७५ टक्केंपेक्षा नागरिकांना मिळाले कोरोना लसीचे दोन्ही डोस, पंतप्रधानांनी केले अभिनंदन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील 75% पेक्षा जास्त लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. त्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेचे अभिनंदन केले आहे. सर्व प्रौढांपैकी 75% जणांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे.Both the doses of corona vaccine were given to more than 75% of the people in the country, congratulated the Prime Minister

या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आपल्या देशवासीयांचे अभिनंदन. जे लोक आपली लसीकरण मोहीम यशस्वी करत आहेत त्यांचा अभिमान आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे की, सबका साथ, सबका प्रयास’ या मंत्राने, भारताने आपल्या 75% प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्याचे लक्ष्य पूर्ण केले आहे.



कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण आणखी मजबूत होत आहोत. आपल्याला सर्व नियमांचे पालन करत राहायचे आहे आणि लवकरात लवकर लस घ्यायची आहे.आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 62,22,682 लोकांना लस देण्यात आली आहे.

त्यानंतर लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या 165 कोटींहून अधिक झाली आहे. यापूर्वी आॅक्टोबर 2021 मध्ये भारतातील एकूण लसीकरणाचा आकडा 100 कोटींवर पोहोचला होता. जानेवारी 2022 मध्ये हाच आकडा 150 कोटींच्या वर पोहोचला होता.

शनिवारी देशात 2.34 लाख नवे कोरोना बाधित आढळले. त्याच वेळी 893 लोकांचा मृत्यू झाला. चांगली गोष्ट म्हणजे या काळात 3.51 लाख लोक बरेही झाले आहेत. शुक्रवारी 2.35 लाख प्रकरणे आणि 871 मृत्यूची नोंद झाली. म्हणजेच, मागील दिवसाच्या तुलनेत नवीन प्रकरणांमध्ये किंचित घट झाली आहे.

Both the doses of corona vaccine were given to more than 75% of the people in the country, congratulated the Prime Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात