भाजपचे “चाचा जान” यूपीत आलेत; पण भाजपवाले त्यांच्यावर केस करणार नाहीत!!; राकेश टिकैत यांचा हल्लाबोल

वृत्तसंस्था

बागपत : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत “अब्बाजान” या राजकीय वक्तव्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरच्या कार्यक्रमात “अब्बाजान” म्हणणाऱ्यांनी कुशीनगरच्या जनतेचे रेशन बांगलादेश आणि नेपाळला पळविले, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर “अब्बाजान”, “चाचाजान” हे शब्द राज्याच्या राजकारणात उसळून वर आले आहेत. BJP’s “Uncle Jaan” came to UP; But BJP will not file a case against them !!; Rakesh Tikait’s attackउत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलकांचे नेते राकेश टिकैत यांनी हाच “चाचाजान” हा शब्द उचलून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या रूपाने भाजपचे “चाचाजान” उत्तर प्रदेशात आले आहेत. ते भाजपला भरपूर शिव्या देतील. त्या पक्षावर टीका करतील, पण भाजपने त्यांच्यावर केस करणार नाही. शेतकरी आंदोलकांवरच ते केसेस करत राहतील, असे टीकास्त्र राकेश टिकैत यांनी सोडले आहे.

असदुद्दीन ओवैसी हे भाजपचे बी टीम असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. तसेच भाजपच्या बागपत येथील शेतकरी मेळाव्यात त्यांनी उत्तर प्रदेशमधील मुसलमानांना ओवैसी यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

BJP’s “Uncle Jaan” came to UP; But BJP will not file a case against them !!; Rakesh Tikait’s attack

महत्त्वाच्या बातम्या