अमरिंदर सिंग एक देशभक्त; युतीसाठी भाजप करणार मैत्रीचा हात पुढे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – अमरिंदर हे एक देशभक्त आहेत आणि राष्ट्रीय हिताला पहिले प्राधान्य देणाऱ्यांशी युती करण्यास भाजपचे खुले धोरण आहे, असे सांगत सरचिटणीस तसेच पंजाबचे प्रभारी दुष्यंत गौतम यांनी मैत्रीचा एक हात पुढे केला आहे.BJP trying to friendship with Amrindar

अमरिंदर यांनी स्वतःचा पक्ष लवकरच काढणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपसह जागावाटप करण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या हितानुसार सुटावेत अशी अट त्यांनी घातली आहे.याविषयी दुष्यंत यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही कार्य करीत आहोत. वेळ आली तर आम्ही दोघे एकत्र बसून याविषयी चर्चा करू. अमरिंदर यांनी आपला पक्ष अद्याप स्थापन केलेला नाही आणि आपली भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे अजून काहीही निश्चीत झालेले नाही.

अमरिंदर हे एके काळी जवान होते. देशासमोर काय धोके आहेत आणि संरक्षण कसे करायचे याची त्यांनी कल्पना आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सीमेवरील सुरक्षेचे मुद्दे जेव्हा उपस्थित झाले तेव्हा त्यांच्या भूमिकेची आम्ही प्रशंसाच केली आहे. राष्ट्रप्रेमी व्यक्ती भाजपसाठी अस्पृश्य नाहीत.

BJP trying to friendship with Amrindar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण