भाजप संसदीय गटाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले – संसद चालवू न देणे हा विरोधकांकडून लोकशाही आणि जनतेचा अपमान

BJP Parliamentary Party Meeting Pm Modi Slams On Oppositions

BJP Parliamentary Party Meeting : संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आज भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. संसदीय पक्षाचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सामील झाले. संसदेत विरोधी पक्षांकडून होत असलेल्या गोंधळावर पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसद चालवू न देणे लोकशाही आणि जनतेचा अपमान आहे. BJP Parliamentary Party Meeting Pm Modi Slams On Oppositions


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आज भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. संसदीय पक्षाचे सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सामील झाले. संसदेत विरोधी पक्षांकडून होत असलेल्या गोंधळावर पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसद चालवू न देणे लोकशाही आणि जनतेचा अपमान आहे.

संसदीय पक्षाची बैठक संपल्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, संसदेत विरोधी पक्षांच्या खासदारांच्या वर्तनामुळे पंतप्रधान संतप्त आहेत. प्रल्हाद जोशी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांची वृत्ती अत्यंत निराशाजनक आहे. पंतप्रधानांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी संसदेत विधेयक मंजूर करण्यासंदर्भात ज्या पद्धतीने वक्तव्य केले त्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, टीएमसी खासदाराने ‘पापरी चाट बनवणे’ ही अपमानास्पद टिप्पणी होती. खासदार म्हणून निवडून आलेल्यांचा हा अपमान आहे.

टीएमसी खासदारांच्या वक्तव्यामुळे गोंधळ वाढला

संसदेत गोंधळादरम्यान मंजूर झालेल्या विधेयकावर डेरेक ओब्रायन यांनी सरकारवर अशी टीका केली होती. डेरेक ओ’ब्रायन यांनी ट्विट केले की, संसदेत कायदे केले जातात किंवा पापडी चाट. यानंतर भाजप नेत्यांनी डेरेक ओब्रायन यांचा निषेध नोंदवत प्रत्युत्तर दिले.

BJP Parliamentary Party Meeting Pm Modi Slams On Oppositions

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण