Ghaziabad Viral Video : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी लोणी सीमा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्याविरोधात तक्रार केली आहे. BJP MLA files complaint against Rahul Gandhi, Owaisi for tweets on Ghaziabad Viral Video to disrupt communal harmony
विशेष प्रतिनिधी
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी लोणी सीमा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
लोणी येथे एका वृद्ध व्यक्तीच्या मारहाणीत सामाजिक सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने राहुल गांधी, असदुद्दीन ओवैसी आणि स्वरा भास्कर यांनी ट्विट केल्याचा आरोप भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केला असून एनएसए अंतर्गत तिघांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वास्तविक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही तरुण मुस्लिम वृद्धाला मारहाण करताना दिसत आहेत. ही घटना 5 जून 2021 ची आहे. या व्हिडिओबद्दल दावा केला जात आहे की, वृद्ध व्यक्तीला मुस्लिम असल्याबद्दल मारहाण केली जात आहे, परंतु तपासणीनंतर पोलिसांना असे आढळले की ते दोन कुटुंबातील परस्पर शत्रुत्वाचे प्रकरण आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर व्हायरल करून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्या तक्रारीवर एसपी ग्रामीण डॉ. इराज राजा म्हणाले की, वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणात भाजपच्या आमदाराने तक्रार दिली असून राहुल गांधी, असदुद्दीन ओवैसी आणि स्वरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून रासुका लावण्याची मागणी केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्यानंतर कारवाई करता येईल.
गाझियाबादमध्ये लोणी भागातील सपा नेते उम्मेद पहलवान यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की, उम्मेद पहलवान यांनी सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा कट रचला होता. एसपी ग्रामीण डॉ. इराज राजा म्हणाले की, व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणात उम्मेद पहलवान नावाच्या स्थानिक नेत्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी, बुधवारी पोलिसांनी गाझियाबादच्या लोणी येथे एका मुस्लिम वृद्धाला मारहाण झाल्याच्या घटनेला धार्मिक रंग दिल्याबद्दल ट्विटर व इतर 8 जणांविरोधात एफआयआर दाखल केला होता. या सर्वांवर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप आहे.
BJP MLA files complaint against Rahul Gandhi, Owaisi for tweets on Ghaziabad Viral Video to disrupt communal harmony
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App