बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला सादर, दहावी-अकरावीतील प्रत्येकी ३० टक्के तर बारावी पूर्व परीक्षेतील गुणांना ४० टक्के वेटेज


बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी सीबीएसईने आपला फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. निकालाचीसाठी . दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास 30% वेटेज आिणि 12 वीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला 40% वेटेज दिले जाईल, असे निकालाचे सूत्र मांडले आहे. न्यायालयानेही याला तत्वत: मान्यता दिली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी सीबीएसईने आपला फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. निकालाचीसाठी . दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास 30% वेटेज आिणि 12 वीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला 40% वेटेज दिले जाईल, असे निकालाचे सूत्र मांडले आहे. न्यायालयानेही याला तत्वत: मान्यता दिली आहे.

सीबीएसईने म्हटले आहे की, बारावीचा अंतिम निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या पूर्व बोर्डच्या निकालाच्या आधारावर तयार केला जाईल. ज्या मुलांना परीक्षा द्यावयाची आहे त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. 31 जुलैला निकाल जाहीर होईल. तसंच दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण घेतले जातील, त्याचप्रमाणे अकरावीच्या पाच विषयांचे सरासरी गुण घेतले जातील आणि 12 वी पूर्व बोर्ड परीक्षा आणि प्रॅक्टिकलचे गुणे घेतले जाईल. दहावीचे 30% गुण, अकरावीच्या गुणातील 30% आणि 12 वी च्या 40% गुणांवर आधारित निकाल लावण्यात येतील.

सीबीएसईने दिलेला फॉर्म्युला न्यायालयाने मान्य केला असल्याने राज्य परीक्षा मंडळांनाही निकाल लावताना याच निकषांचा वापर करता येणार आहे. मात्र, महाराष्ट्रासारख्या राज्यात काही अडचणी येणार आहेत. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थी दहावीपर्यंत शाळेत असतात आणि त्यानंतर महाविद्यालयांना संलग्न असलेल्या वर्गांमधून अकरावी आणि बारावीची परीक्षा देतात.

असे असेल निकालाचे प्रस्तावित सूत्र

वर्ग कोणत्या आधारे मूल्यांकन केले जाईल टक्केवारी

  • 12 वी युनिट टेस्ट/मीड टर्म / पूर्व परीक्षाच्या आधारे मार्क्स 40%
  • 11 वी थेअरी परीक्षेच्या आधारे मिळालेले मार्क्स 30%
  • 10 वी पाच मुख्य विषयांपैकी सर्वात जास्त मार्क्स मिळविणारे 30%
  • तीन विषयांच्या मार्क्सची सरासरी

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती