गौतम अदानी: बी कॉम ड्रॉप आऊट, वडलांकडून मिळालेल्या १०० रुपयांवर व्यवसाय, आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत ते तीन दिवसात गमावले ७० हजार कोटी रुपये

शेअर बाजारात मोठे नुकसान झाल्याने अदानी ग्रूपचे गौतम अदानी यांनी तीन दिवसांत तब्बल ७० हजार कोटी रुपये गमावले आहेत. त्यामुळे अशियातील दुसरे सर्वात श्रीमंत हे बिरुद गौत अदानी यांनी गमावले आहे. ते आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. Gautam Adani: B com drop out, business on Rs 100 received from father, second richest in Asia to lose Rs 70,000 crore in three days


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शेअर बाजारात मोठे नुकसान झाल्याने अदानी ग्रूपचे गौतम अदानी यांनी तीन दिवसांत तब्बल ७० हजार कोटी रुपये गमावले आहेत. त्यामुळे अशियातील दुसरे सर्वात श्रीमंत हे बिरुद गौत अदानी यांनी गमावले आहे. ते आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत.

अवघ्या तीन दिवसांत गौतम अदानी यांच्या मालमत्तेत जवळपास ९.४ अब्ज डॉलर म्हणजेच ७० हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. ब्लमबर्ग बिलिनिअर इंडेक्सच्या माहितीनुसार, गौतम अदानी यांच्या एकूण मालमत्तेत ४ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. गौतम अदानी यांच्या नुकसानीनंतर चीनचे उद्योगपती झोंग शशान पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश अंबानी अव्वल स्थानी कायम आहेत.

शेअर बाजारात अदानी ग्रूपच्या शेअर्रमध्ये मोठी घसरण झाली. अदानींच्या पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनचे शेअर्स गडगडले आहेत. याशिवाय अदानी ट्रान्समिशन, अदानी पावर आणि अदानी टोटल गॅसचे शेअर्सही गडगडले आहेत. याचे कारण म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं (एनएसडीएल) तीन विदेशी फंडींग अकाऊंटवर स्थगिती आणली आहे. याच फंडांनी अदानी ग्रूपमधील कंपन्यांमध्ये ४३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सची पडझड सुरू झाली. बहुतेक शेअर्सला लोअर सर्किट लावावं लागलं. सलग तीन दिवसांपासून अदानीच्या शेअर्सला गळती लागली आहे.



अदानी यांना मोठा धक्का बसला अशाला तरी या संकटातूनही तरून जाण्याचा त्यांना विश्वास आहे. याचे कारण म्हणजे अदानी हे सेल्फमेड बिझनेसमन आहेत. अदानी यांना उद्योग वारशातून मिळालेला नाही तर त्यांनी आपल्या कर्तृत्वाने कमावला आहे. त्यांचे वडील शांतीलाल यांचे कपड्याचे दुकान होते. सात भावंडातील गौतम यांनी वाणिज्य शाखेतील शिक्षणाला महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षीच सोडचिठ्ठी दिली. वडिलांचा कापडाचा व्यापार सोडून हिऱ्याच्या व्यापारात ते उतरले.

त्यावेळी वडीलांनी त्यांना केवळ शंभर रुपये आणि मुंबईतील काही नातेवाईकांचे पत्ते दिले होते. पहिली 2-3 वर्षं हिरे वेचण्याचं काम करत असतानाच त्यांनी स्वत:ची हिरे ब्रोकरेज कंपनी थाटली. विशेष म्हणजे पहिल्या तीन वर्षांतच त्यांची गणना या व्यापारातल्या लक्षाधीशांमध्ये व्हायला लागली. हिरे व्यापारात त्यांचा जम बसत असतानाच त्यांचे मोठे भाऊ मनसुखलाल यांनी अहमदाबादमध्ये प्लास्टिक व्यवसाय सुरू केला. त्यांनी गौतम यांना मदतीसाठी बोलावलं. फॅक्टरी सांभाळताना त्यांनी व्यवसायाला पॉलीमर आणि पीव्हीसी आयात करणाºया कंपनीमध्ये बदलले. छोट्या उद्योगांसाठी लागणारं पीव्हीसी आयात करायला त्यांनी सुरुवात केली.

अदानी एक्सपोर्ट्स या अदानी साम्राज्याच्या पहिल्या आणि होल्डिंग कंपनीचा श्रीगणेशा झाला. एक्स्पोर्ट बरोबरीने खाजगी जेट्टी स्थापन केली. मुंद्रा बंदराची व्यवस्था सांभाळण्याचे खाजगी कंत्राट गुजरात सरकारने 1995मध्ये काढले. ते गौतम अदानी यांनाच मिळालं. अदानी पोर्ट्स ही देशातली सगळ्यात मोठी खाजगी बंदर व्यवस्थापन कंपनी आहे. मुंद्रा बंदरातून वषार्ला 21 कोटी टनाइतक्या वस्तू आणि मालाचा व्यापार होतो. 1996मध्ये स्थापन झालेली अदानी पॉवर ही कंपनी देशातली सगळ्यात मोठी खाजगी उर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे.

Gautam Adani: B com drop out, business on Rs 100 received from father, second richest in Asia to lose Rs 70,000 crore in three days

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात