STORY BEHIND EDITORIAL : महाविकास आघाडीत कॉंग्रेसची अवहेलनाच ! शिवसेना- राष्ट्रवादीला एकत्र लढावे लागेल म्हणतं ‘सामना’च्या अग्रलेखातून थेट काँग्रेसवर बाण


  • शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकीत एकत्र लढणार म्हणजेच indirectly हा कॉंग्रेसला इशारा  किंवा धमकी म्हणता येईल .असं मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केलं आहे.

  • महाविकास आघाडी सरकारमधील इतर दोन्ही पक्ष एक प्रकारे दबावाचं राजकारण करत असल्याचं चित्र आहे

  • दरम्यान, आजच्या (17 जून) सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने काँग्रेसला अनेक गोष्टी सुनावल्या आहेत.

  • त्यात कोरोनाचा धूमाकूळ पूर्णत: थांबलेला नाही. या परिस्थितीतही काही लोकांना राजकारण, निवडणुका, स्वबळाचे वेध लागले आहेत.STORY BEHIND EDITORIAL: Contempt of Congress in Mahavikas Aghadi! Shiv Sena: NCP will have to fight together

विशेष प्रतिनिधी

मुंबई: सामनाच्या अग्रलेखात आज कॉंग्रेस निशान्यावर आहे. ‘जर सगळेच स्वबळावर लढत असतील तर शिवसेना  आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करुन एकत्र लढावे लागेल.’ असं थेट मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचे सिद्ध झाले आहे .महाविकास आघाडीत कॉंग्रेसची अवहेलना झाल्याने कॉंग्रेस पक्ष नेहमीच नाराज असतो आता तर थेट शिवसेना- राष्ट्रवादीला एकत्र लढावे लागेल म्हणतं ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसवर बाण सोडण्यात आले आहेत.STORY BEHIND EDITORIAL: Contempt of Congress in Mahavikas Aghadi! Shiv Sena: NCP will have to fight together

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने स्वबळाचा नारा देत आहेत. अशावेळी आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या तर दिल्या आहेतच मात्र, यापुढे आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत निवडणूक लढवू असंही स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील वक्तव्य केलं होतं की, आगामी निवडणुका या शिवसेनेला सोबत घेऊन लढवल्या जातील. त्यामुळे आता काँग्रेस एकाकी पडले हे नक्की.

अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रात  शिवेसना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष .या पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करुन एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे.

महाराष्ट्रात आधीच स्वबळाचे अजीर्ण झाले आहे. त्यात आणखी भर नको.

•महाराष्ट्रात रोज एक नवी समस्या उभी राहत आहे. राज्य अस्थिर व्हावे, आर्थिकदृष्ट्या कमजोर पडावे यासाठी राजकारणातील काही दुष्ट शक्ती टपून बसल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाचे अजीर्ण झालेले दिसते. कारण जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. एका बाजूला राज्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्द्याने जोर धरला आहे.

महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके ‘ग्रस्त’ असतील असे कधीच वाटले नव्हते. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. त्यांनीही आता आगामी निवडणुका स्वबळावर लढून महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे.

स्वबळावर सत्ता आणू आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वबळावर करु, असे त्यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही. मुख्यमंत्री मीच, पक्षाने परवानगी दिली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण बनण्यास तयार असल्याचे विधानही त्यांनी केले आहे.

राजकारणात इच्छा, महत्त्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण शेवटी बहुमताचा आकडा नसेल तर बोलून व डोलून काय होणार?

2024 चे मैदान अद्याप लांब आहे, पण प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा अचानक करु लागले आहेत.

STORY BEHIND EDITORIAL: Contempt of Congress in Mahavikas Aghadi! Shiv Sena: NCP will have to fight together

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात