अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मास अटक; २८ जूनपर्यंत दोन साथीदारांसह पोलीस कोठडी


वृत्तसंस्था

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई पोलीसांचा माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि शिवसेना नेता प्रदीप शर्मापर्यंत पोहोचल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने त्यांच्या घरावर आज पहाटे छापा घालून अटक केली.Mumbai: NIA conducts raid at the residence of Shiv Sena leader and former ‘encounter specialist’ of Mumbai Police, Pradeep Sharma

आज सकाळी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतल्या निवासस्थानी एनआयएच्या टीमने छापा घातला. त्यांची चौकशी केली आणि दुपारी अटक केली. एनआयएच्या विशेष कोर्टाने प्रदीप शर्माला २८ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनवली आहे. प्रदीप शर्माबरोबरच त्याच्या दोन साथीदारांना देखील २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.



आज सकाळी प्रदीप शर्माच्या घरी छापेमारी केल्यानंतर त्याला एनआयए अटक करण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती होतीच. शर्माच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये काही कागदपत्रे आणि काही वस्तू सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच एनआयएने प्रदीप शर्माच्या दोन निकटवर्तीयांना अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रदीप शर्माच्या घरी छापे टाकण्यात आले असून त्याची चौकशी करून त्यास अटक केली.

https://twitter.com/ANI/status/1405377157921050628?s=20

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास्थानाजवळ सुमारे अडीच किलो जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणात एनआयएने सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यास अटक केली. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयएकडे असून या दोन्ही प्रकरणात वाझेच्या संपर्कात प्रदीप शर्मा होते, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

Mumbai: NIA conducts raid at the residence of Shiv Sena leader and former ‘encounter specialist’ of Mumbai Police, Pradeep Sharma

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात