भाजपमध्ये राज्य पातळीवर “कामराज योजना”…??; पण हे पतंग कापणे नव्हे, तर निवडणूक यशासाठी भविष्यवेधी पावले!!


विनायक ढेरे

नाशिक : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज अचानक राजीनामा देऊन भाजप संघटनेसाठी काम करण्याची तयारी दर्शविली आहे. भाजप अंतर्गत प्रचंड मोठी घडामोड सुरू असल्याचे समोर येत आहे. त्याच वेळी अनेकांकडून भाजपमध्ये केंद्रीय पातळी पाठोपाठ राज्यांमध्ये देखील मोठ्या फेरबदलांची “कामराज योजना” सुरू आहे काय?, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. BJP leadership changing move in Gujarat to standwith its poll performance and even improve it

गेल्या तीन-चार महिन्यांत भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडत केंद्रीय मंत्रिमंडळ या पासून ते तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्यापर्यंत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. 12 केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे, 39 नव्या मंत्र्यांचा समावेश यासह उत्तराखंड कर्नाटक आणि आता गुजरात या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे राजीनामे तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या राजीनाम्याची शक्यता या सर्व घडामोडी भाजपमध्ये घडत आहेत.भाजप अंतर्गत वर्तुळाचा कानोसा घेतला असता ही नैसर्गिक नेतृत्व बदलाची प्रक्रिया असल्याचे सांगण्यात येत असले तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल करणे यातून भाजपचे केंद्रीय नेतृत्व संपूर्ण देशभरात काही वेगळा संदेश देऊ इच्छित असल्याचे स्पष्ट होत आहे. नव्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पुढच्या निवडणुका लढविण्याची तयारी करण्याची दमदार पावले पडताना दिसत आहेत. अर्थात जुन्या नेतृत्वाला कोणतेच काम उरणार नाही ही शक्यता फार कमी आहे. पण नवीन नेतृत्व, त्याला दिलेली जबाबदारी आणि त्यातून निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता याची टक्केवारी निश्चित वाढते हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला अनुभवाने समजले आहे. मोदींनी मुख्यमंत्री असताना हा प्रयोग गुजरातमध्ये अनेकदा केला आहे.

भाजपचे सध्याचे केंद्रीय नेतृत्व वाजपेयी – अडवाणींचे तडजोड करणारे नेतृत्व नाही. ते मोदी – शहांचे पूर्ण बहुमतवाल्या सरकारचे नेतृत्व आहे. त्यामुळे राज्यांमध्ये देखील ते मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याचे राजकीय धाडस दाखवू शकतात. त्याला अनुसरूनच उत्तराखंड, कर्नाटक आणि आता पाठोपाठ गुजरात या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

नवे मुख्यमंत्री गुजरातमध्ये कोण असतील याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. अर्थातच ते नितीन पटेल या नावाभोवती फिरत आहेत. पण मोदी – शहांच्या मनात तेच नाव असेल याची कोणीही खात्री देऊ शकत नाही.

पण एक मात्र निश्चित 1960 च्या दशकात काँग्रेसने केंद्रीय पातळीवर पंतप्रधान पंडित नेहरू यांना आव्हान उभे राहू नये यासाठी कामराज योजनेद्वारे दिग्गज केंद्रीय मंत्र्यांचे पतंग कापले होते. भाजपमध्ये मात्र सध्या ही अवस्था नाही. केंद्रीय नेतृत्वाला धोका तर सोडाच उलट केंद्रीय नेतृत्वाच्या आश्रयानेच राज्यांची नेतृत्व बदलण्याची आणि वाढविण्याची राजकीय मशक्कत भाजपमध्ये सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

BJP leadership changing move in Gujarat to standwith its poll performance and even improve it

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय