५० हजारांचा पगार ते २५० काेटीच्या कंपनीचा मालक बीटकाॅईन गुन्हयातील आराेपी पंकज घाेडेची अफलातून घाेडदाैड


बिटकॉइन गुन्ह्यातील सायबर तज्ञ आरोपी पंकज घाेडे हा एका खासगी कंपनीत नाेकरी करत हाेता आणि त्यास सुमारे ५० हजार रुपयांचा पगार हाेता परंतु मागील चार वर्षात त्याने वेगवेगळया कंपन्या स्थापन करुन २५० काेटी रुपयांची आर्थिक उलाढाल करत असल्याचे पाहून पाेलीस चक्रावले असून त्यांनी संबंधित कंपन्यात गुंतवणुक करण्यासाठी पैसे काेठुन आणले गेले याचा तपास सुरु केला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे -बीटकाॅईन गुन्हयाच्या तपासात पुणे पाेलीसांना २०१८ मध्ये तांत्रिक तज्ञ म्हणून सहाय्य करणाऱ्या पंकज प्रकाश घाेडे (वय-३८,रा.ताडीवाला राेड,पुणे) याची मदत घेतली हाेती. परंतु बीटकाॅईन गुन्हयातील आराेपींच्या क्रिप्टाेकरन्सी खात्यावरील बीटकाॅईन परस्पर त्याने इतर क्रिप्टाे करन्सी खात्यात वर्ग केल्याचे पाेलीसांनी चार वर्षानंतर केलेल्या चाैकशीत निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पुणे पाेलीसांना मदत करताना पंकज घाेडे हा एका खासगी कंपनीत नाेकरी करत हाेता आणि त्यास सुमारे ५० हजार रुपयांचा पगार हाेता परंतु मागील चार वर्षात त्याने वेगवेगळया कंपन्या स्थापन करुन २५० काेटी रुपयांची आर्थिक उलाढाल करत असल्याचे पाहून पाेलीस चक्रावले असून त्यांनी संबंधित कंपन्यात गुंतवणुक करण्यासाठी पैसे काेठुन आणले गेले याचा तपास सुरु केला आहे.

Bitcoin cheating case cyber expert accused pankaj ghode property of 250 cr, police investigate where the money comeing from investment in Comany

पंकज घाेडे सुरुवातीला बिगर शासकीय संस्था असलेल्या ग्लाेबल ब्लाॅकचेन फाऊंडेशन कंपनीचे काम करत हाेता. मात्र, सन २०१८ पासून घाेडे याने इग्नेटिव्ह ग्लाेबल प्रा.लि., एराेनुब्रे टेक्नाॅलाॅजी प्रा.ली, आयसायबर सेक्युरीटी ग्लाेबल सर्व्हिसेस प्रा.लि., प्रणीत कुमार अँड असाेसिएटस एलएलपी, पी४२ इनव्हेसटमेंट अँड एडव्हायझरी व्हेंर्चस एलएलपी, व्हेराेला टेक्नाॅलाॅजी प्रा.ली.,अग्री १० एक्स या सहा कंपन्या स्थापन केल्या हाेत्या आणि त्यांचे मुख्यालय पुणे आहे. यातील काही कंपन्या आर्थिक डबघाईला अाल्याचे त्याने पाेलीसांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, एग्री १० एक्स ही कंपनी प्रामुख्याने माेठया प्रमाणात कार्यरत असून त्याद्वारे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी ऑनलाईन प्लॅटफाॅर्म उपलब्ध करुन दिल्याचे सांगण्यात येते. या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला दहा शेतकऱ्यांपासून सुरुवात करुन सध्या देशभरातील दाेन लाख शेतकऱ्यांपर्यंत पाेहचून त्यांचा शेतमाल ऑनलाईन विक्री करण्यात येत असल्याचे सांगितले गेले. कंपनीत साधारण २५० कर्मचारी काम करत असून त्यांना १५ हजारापासून ८० हजारा पर्यंत पगार पंकज घाेडेच्या माध्यमातून दिला जात आहे.देशातील विविध राज्यातील सात हजार ट्रेडर थेट त्याच्या कंपनीच्या माद्यमातून शेतकऱ्यांकडून शेतमाल घेत असून २५० काेटींची वार्षिक आर्थिक उलाढाल हाेत असल्याचे दाखवले गेले आहे. परदेशातही त्याने गुंतवणुक केल्याचे हजाराे इथर, युराे चलनात व्यवहार केल्याची बाब पाेलीस तपासात उघड झाली असून त्यासंर्दभात चाैकशी करण्यात येत आहे. काेटयावधी रुपयांची आर्थिक उलाढाल संबंधित कंपन्यातून हाेऊनही तीन वर्ष आयकर कर भरला गेलेला नसून त्याबाबत आता आयकर विभागही तपास करत आहे.

क्रिप्टाे वाॅलेट नसल्याचा कांगावा

पंकज घाेडे याने निगडी व दत्तवाडी पाेलीस ठाण्यात दाखल असलेल्या बीटकाॅईन गुन्हयाचे तपासकामी पाेलीसांना सादर केलेले स्क्रिनशाॅट हे क्राॅप करुन अहवालात दिले असल्याचे तसेच त्यात दिलेली क्रिप्टाे करन्सीची आकडेवारी चुकीची असल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे त्यातील तारीख व जप्त व शिल्लक क्रिप्टाे करन्सी त्यात देखील तफावत आढळून आली आहे. ब्लाॅकचेन वेबसाईटवर पाेलीसांनी पाहणी केली असता पंकज घाेडे याने आराेपींच्या खात्यावरुन पाेलीस वाॅलेटवर क्रिप्टाेकरन्सी वळविताना इतरही काही क्रिप्टाेकरन्सी खात्यावर ती वळविल्याचे दिसून आले आहे. पाेलीसांच्या तपासात घाेडे याने त्याचे क्रिप्टाे करन्सी वाॅलेट नसल्याचे सांगितले हाेते. परंतु त्याचे माेबाईल व लॅपटाॅपचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यात त्याने क्रिप्टाे करन्सी संर्दभात व्यवहार केल्याचे तसेच अनेक क्रिप्टाे वाॅलेटचे स्क्रीनशाॅट मिळून आले आहे. मात्र, पाेलीसांना चाैकशी दरम्यान ताे सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येते आहे.

Bitcoin cheating case cyber expert accused pankaj ghode property of 250 cr, police investigate where the money comeing from investment in Comany

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात