मोठी बातमी : रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये शिरले; युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांचा म्हणतात – 4 दिवसांत राजधानीवर होऊ शकतो ताबा


शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. राजधानी कीव्ह सकाळी ७ मोठ्या स्फोटांनी हादरली. रात्रीपासून लोक घरे, भुयारी मार्ग, भूमिगत आश्रयस्थानांमध्ये लपून बसले आहेत. खाण्यापिण्यापासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा आहे.Big news Russian troops infiltrated the Ukrainian capital Kiev; Ukrainian president says – take over the capital in 4 days


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. राजधानी कीव्ह सकाळी ७ मोठ्या स्फोटांनी हादरली. रात्रीपासून लोक घरे, भुयारी मार्ग, भूमिगत आश्रयस्थानांमध्ये लपून बसले आहेत. खाण्यापिण्यापासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा आहे.

दरम्यान, रशियाचे सैन्य राजधानीत घुसल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. येत्या ९६ तासांत म्हणजे ४ दिवसांत कीव्ह रशियाच्या ताब्यात जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, रशियन सैन्याने निवासी भागांना लक्ष्य केले आहे. त्यांनी रशियन नागरिकांना या युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.



त्याच वेळी पश्चिम युक्रेनमधील लिव्ह शहरात हवाई हल्ल्याचा सायरन ऐकू आला. यानंतर येथील महापौरांनी लोकांना घराबाहेर पडू नका असे सांगितले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाला पाठिंबा देणाऱ्या देशांना इशारा दिला आहे. युक्रेनवरील युद्धाला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या हातालाही रक्त लागेल, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 137 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 316 जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, युद्धात लढण्यासाठी जगाने आम्हाला एकटे सोडले आहे. अमेरिकेने घोषित केले की ते युरोपमध्ये 7000 अतिरिक्त सैन्य तैनात करत आहेत. अमेरिकेने वॉशिंग्टनमधील रशियन दूतावासात पोस्ट केलेल्या उच्च-पदस्थ डिप्लोमॅटला आपल्या देशातून काढून टाकले आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन केला. यापूर्वी भारत, पाकिस्तान, इराणच्या राष्ट्रप्रमुखांनी पुतीन यांच्याशी चर्चा केली आहे.

Big news Russian troops infiltrated the Ukrainian capital Kiev; Ukrainian president says – take over the capital in 4 days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात