Bhima koregaon case : राजीव गांधींच्या पद्धतीने पंतप्रधान मोदींना संपवण्याचा सीपीआय माओवाद्यांचा डाव; एनआयए कोर्टाने आरोपींचा जामीन फेटाळला!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप आणि हनी बाबू यांचे जामीन अर्ज राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए कोर्टाने फेटाळले आहेत.Bhima koregaon case

माजी पंतप्रधान राजीव गांधींना ज्या पद्धतीने संपवले त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एखाद्या रोड शो मध्ये संपवण्याचा सीपीआय माओवाद्यांचा डाव होता, असे संबंधित संघटनेच्या पत्रातून उघड झाले आहे. हे पत्र अतिशय गंभीर आहे, असे निरीक्षण एनआयए कोर्टाने नोंदविले आहे.

त्याच वेळी कोर्टाने वरील चौघा आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप आणि आणि हनी बाबू हे सीपीआय माओवादी संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेने विविध पुराव्यांच्या आणि कागदपत्रांच्या आधारे एनआयए कोर्टामध्ये केला आहे.

या संदर्भात एक पत्र एनआयएने कोर्टात सादर केले. या पत्रामध्ये उघडपणे मोदी राज हे राजीव गांधींना ज्या पद्धतीने संपविले त्याच पद्धतीने संपविले पाहिजे. मोदींना एखादी एखाद्या रोड शो दरम्यान टार्गेट केले पाहिजे, असे स्पष्टपणे म्हटले आहे. या पत्राची गंभीर दखल एनआयए कोर्टाने घेतली असून त्यांनी चौघा आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Bhima koregaon case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात