कोरोनाने हाकनाक मरण्यापेक्षा लसीकरण चांगले; अमेरिकेच्या संशोधनातील अहवालातून बाब स्पष्ट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तुम्ही अजून कोरोनाची लस घेतली नसेल तर ही बाब धोकादायक आहे. पण, लस घेतल्याने कोरोनामुलर होणारा मृत्यू तुम्ही टाळू शकता असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. Better to take the vaccine than to die due to corona. The matter is clear from the report of the American research

लस घेतल्यानंतरही आपल्याला संसर्ग होऊ शकतो, परंतु गंभीरपणे आजारी पडण्याच्या आणि मृत्यूच्या जोखमीपासून आपले नक्कीच संरक्षण लस करते. यूएस हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने एक संशोधन केले. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की लसीकरण केलेल्या लोकांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा धोका नगण्य आहे.



संशोधनात, अमेरिकेतील १२२८६६४ लोकांच्या आरोग्याचा मागोवा घेण्यात आला जेव्हा डेल्टा प्रकार देशात कहर करत होता. या सर्व लोकांनी डिसेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान कोरोनाची लस घेतली. अभ्यासात हे परिणाम समोर आले आहेत.. २२५६ म्हणजेच ०.१ % लोकांना पुन्हा कोरोना संसर्ग झाला आहे. १८९ म्हणजे ०.०१ % लोक गंभीर आजारी पडले. ३६ म्हणजे ०.००२९ % लोकांनी आपला जीव गमावला. मृत रुग्णांपैकी २८, म्हणजे ७७ %, असे होते ज्यांना चार किंवा त्याहून अधिक गंभीर आजार होते. उदाहरणार्थ, मधुमेह, किडनीचे आजार, यकृताचे आजार, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, मानसिक आजार इत्यादी.

६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही निरोगी व्यक्तीला संसर्ग झाला नाही. लस मिळाल्यानंतर प्रत्येक दीड लाख लोकांपैकी फक्त एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. हा आकडा आगीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येएवढा आहे. लसीकरण झालेल्या लोकांचा करोनापेक्षा वीज पडून आणि भूकंपाने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. अशा लोकांमध्ये, कार अपघातामुळे मृत्यूची शक्यता देखील कोरोनापेक्षा ३ पट जास्त आहे. यापूर्वीच्या अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनामुळे लहान मुलांचा मृत्यू होण्याचा धोका खूपच कमी आहे.

Better to take the vaccine than to die due to corona. The matter is clear from the report of the American research

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात