रजा अकादमीवर बंदी घाला, विश्व हिंदू परिषदेची मागणी


महाराष्ट्रातील काही शहरांत नियोजनबद्ध पद्धतीने हिंसाचार झाला. या संबंध घटनाक्रमामागे रजा अकादमी व अन्य सहा संघटना आहेत. रजा अकादमीवर निर्बंध घालून, पीडितांची नुकसानभरपाई त्यांच्याकडून वसूल केली जावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद परांडे यांनी केली. रविवारी ते धंतोली येथील विहिंपच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.Ban on Reza Academy, demand of Vishwa Hindu Parishad


विशेष प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्रातील काही शहरांत नियोजनबद्ध पद्धतीने हिंसाचार झाला. या संबंध घटनाक्रमामागे रजा अकादमी व अन्य सहा संघटना आहेत. रजा अकादमीवर निर्बंध घालून, पीडितांची नुकसानभरपाई त्यांच्याकडून वसूल केली जावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद परांडे यांनी केली. रविवारी ते धंतोली येथील विहिंपच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

त्रिपुरा येथील घटनेला उचलून धरत रजा अकादमी व अन्य सहा संघटनांनी अमरावती, मालेगाव, नांदेड शहरात मोर्चा काढत हिंदूंची घरे, व्यापारी प्रतिष्ठानांवर पोलिसांच्या देखत हल्ला बोलला. अचानक झळकलेले बॅनर्स आणि सोशल मीडियावरील संदेशांवरून या घटना पूर्णत: सुनियोजित होत्या.


बांगलादेशातील हिंदूंचे हत्याकांड संतापजनक, शांतीसेना पाठविण्याची विहिंपची मागणी


 

मात्र, यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शासन-प्रशासन आपल्या सुरक्षेत हयगय करीत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांनी मोर्चा काढला. मात्र, गुन्हेगारांना सोडून पीडितांवरच पोलिसांनी लाठीचार्ज केला, असा आरोप परांडे यांनी केला.

Ban on Reza Academy, demand of Vishwa Hindu Parishad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात