‘ऑपरेशन सनराइज’, बालाकोट एअर स्ट्राइकचे नियोजक लेफ्टनंट जनरल अनिल चौहान नवे CDS


वृत्त्तसंस्था

नवी दिल्ली : देशाला तब्बल 10 महिन्यांनी दुसरे संरक्षण दल प्रमुख अर्थात नवे CDS मिळाले आहेत. केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून नियुक्ती केली आहे. लेफ्टनंट जनरल चौहान हे देखील भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्यासारखेच उत्तराखंडच्या गढवालचे सुपुत्र आहेत. ते सीडीएस पद संभाळण्याबरोबरच डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेयर्स मध्ये सचिव म्हणून काम बघतील. Balakot Air Strike Planner Lt Gen Anil Chauhan New CDS

 झळाळती लष्करी कारकीर्द

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची 40 वर्षांची झराळती लष्करी कारकीर्द आहे. भारत – म्यानमार सीमेवर दोन्ही फौजांनी दहशतवादी घुसखोरांविरुद्ध संयुक्तपणे केलेल्या “ऑपरेशन सनराइजचे” ते मूळ योजनाकार होते. त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये अनेक दहशतवाद विरोधी ऑपरेशनची योजना त्यांनी यशस्वी करून दाखविली आहे. पाकिस्तान मधल्या बालाकोट एअर स्ट्राइकच्या नियोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कर प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी ते ईस्टर्न आर्मी कमांडचे मुख्य झाले होते.

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे दहशतवाद आणि घुसखोरी विरुद्ध सैनिकी कारवाई या विषयातले तज्ञ मानले जातात. त्यांची बहुतांश लष्करी कारकीर्द जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील सीमावरती भागात झाली आहे.

– 10 महिन्यानंतर नियुक्ती

भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचा 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूत हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि लष्करातले 16 वरिष्ठ अधिकारी देखील याच दुर्घटनेत मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर गेले 10 महिने हे पद रिक्त राहिले होते. दरम्यानच्या काळात अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची नावे सीडीएस पदासाठी माध्यमांमधून चर्चेला आली होती. परंतु, आज 28 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची भारताचे दुसरे CDS म्हणून नियुक्ती केली आहे.

Balakot Air Strike Planner Lt Gen Anil Chauhan New CDS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात