छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श जीवन बाबासाहेबांनी देशासमोर मांडले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमृतराव पुरंदरे यांना भावपूर्ण पत्र


प्रतिनिधी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श जीवन बाबासाहेब पुरंदरे यांनी देशातल्या जनतेसमोर ठेवले. आयुष्यभर त्या आदर्शांवर त्यांनी वाटचाल केली आणि नि:स्वार्थ सेवेसाठी ते देशातल्या युवकांसमोर रोल मॉडेल बनून राहिले आहेत, अशा भावपूर्ण शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.Babasaheb presented the ideal life of Chhatrapati Shivaji Maharaj to the nation

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांचे जेष्ठ चिरंजीव अमृतराव पुरंदरे यांना सांत्वनपर पत्र पाठवून आपल्या बाबासाहेबांविषयीच्या आदरयुक्त भावना व्यक्त केल्या आहेत. “जाणता राजा” या बाबासाहेबांच्या भव्यदिव्य नाट्यप्रयोगला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले होते. त्यांचा अनेकदा सहवास मला मिळाला होता. त्यांची प्रेरणादायी भाषणे मी ऐकली होती, अशा आठवणी देखील पंतप्रधान मोदींनी या पत्रांमधून जागविल्या आहेत.


शिवसृष्टी उभारण्याची बाबासाहेब पुरंदरे यांची इच्छा लवकर पूर्ण करा; उदयनराजेंची सरकारला विनंती


छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांचे कर्तृत्व, मराठा साम्राज्याचा देदिप्यमान इतिहास हा बाबासाहेबांच्या जीवनाचा श्वास आणि ध्यास होता. देशासमोर आणि जगासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे अवघे जीवन त्यांनी मांडले. आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास घराघरांमध्ये पोहचविला.

बाबासाहेबांनी फक्त देशाच्या देदीप्यमान इतिहासावर भाष्य केले असे नाही तर ते स्वतः कृतिशील व्यक्तिमत्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन त्यांनी गोवा मुक्तिसंग्राम आणि दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम यांच्यामध्ये सहभाग घेतला होता, अशा भावना देखील पंतप्रधानांनी या पत्रांमधून व्यक्त केल्या आहेत.

Babasaheb presented the ideal life of Chhatrapati Shivaji Maharaj to the nation

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात