कोणत्या कायद्यानुसार मशिदींना भोंगा वापरण्याची परवानगी दिली, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : मशिदींना कायद्याच्या कोणत्या कलमांखाली लाऊडस्पीकरचा वापर करण्याची परवानगी दिली गेली आहे, असा सवाल कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण नियमांच्या अंतर्गत लाऊडस्पीकरचा वापर थांबवण्यासाठी काय कारवाई केली जात आहे, असादेखील प्रश्न न्यायालयाकडून विचारण्यात आला आहे.Under what law allowed mosques to use loudspeakers , the High Court slammed the state government

१० ते २६ मशिदींना कायद्याच्या कोणत्या कलमांखाली लाऊडस्पीकर आणि जनसंबोधन यंत्रणा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे, याचं उत्तर प्रतिवादी राज्य सरकारच्या अधिकाºयांनी द्यावे, असे मुख्य न्यायमूर्ती ऋतूराज अवस्थी आणि न्यायमूर्ती सचिन शंकर मखदूम यांनी आदेशात म्हटलं. लाऊडस्पीकरचा वापर रोखण्यासाठी ध्वनी प्रदूषण नियम, २००० नुसार कोणती कारवाई केली जात आहे याची माहिती अधिकाºयांनीनी द्यावी, असंही न्यायालयानं सांगितलं.



या प्रकरणी राकेश पी आणि अन्य काही जणांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्यावतीनं श्रीधर प्रभूंनी बाजू मांडली. ‘२००० च्या नियमातील कलम ५(३) च्या अंतर्गत लाऊडस्पीकर आणि जन संबोधन यंत्रणेच्या वापराची परवानगी स्थायी रुपानं दिली जाऊ शकत नाही,’ असा युक्तिवाद प्रभूंनी न्यायालयात केला.

नियम ५(३) नुसार लाऊडस्पीकर/जन संबोधन यंत्रणांचा (आणि ध्वनी निर्माण करणारी उपकरणं) वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारला मर्यादित कालावधीसाठी कोणत्याही सांस्कृतिक, धार्मिक आणि उत्सवासाठी रात्री १० ते १२ पर्यंत लाऊडस्पीकर किंवा अन्य ध्वनी उपकरणांचा वापर करण्याची परवानगी देण्याचा अधिकार मिळतो. मात्र सरकार एका वर्षात पंधरा दिवसच अशी परवानगी देऊ शकते.

Under what law allowed mosques to use loudspeakers , the High Court slammed the state government

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात