पॅटनंतर ब्रेट लीचाही पुढाकार, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी क्रिप्टो रिलिफअंतर्गत एका बिटकॉइनचे दान, भारतीय चलनात ४१ लाख रुपये

Australian Cricketer Brett Lee Donates One Bitcoin to India For Oxygen Supply IPL 2021

Brett Lee Donates One Bitcoin to India : ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू भारतातील कोरोना संकटाच्या काळात मदतीचा हात देताना दिसत आहेत. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पीएम केअर्स फंडमध्ये 37 लाखांची देणगी दिली. आता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक ब्रेट लीने मदतीसाठी हात पुढे केला आहे. भारतातील रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठ्यासाठी एक बिटकॉईन देण्याचे आश्वासन त्याने दिले आहे. बिटकॉइन एक प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे. सध्या एका बिटकॉइनची किंमत भारतीय चलनात सुमारे 41 लाख रुपये आहे. ब्रेट लीची ही मदत क्रिप्टो रिलीफच्या अंतर्गत आहे. पॅट कमिन्सच्या मदतीचीही त्याने प्रशंसा केली आहे. Australian Cricketer Brett Lee Donates One Bitcoin to India For Oxygen Supply IPL 2021


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू भारतातील कोरोना संकटाच्या काळात मदतीचा हात देताना दिसत आहेत. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पीएम केअर्स फंडमध्ये 37 लाखांची देणगी दिली. आता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक ब्रेट लीने मदतीसाठी हात पुढे केला आहे. भारतातील रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठ्यासाठी एक बिटकॉईन देण्याचे आश्वासन त्याने दिले आहे. बिटकॉइन एक प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे. सध्या एका बिटकॉइनची किंमत भारतीय चलनात सुमारे 41 लाख रुपये आहे. ब्रेट लीची ही मदत क्रिप्टो रिलीफच्या अंतर्गत आहे. पॅट कमिन्सच्या मदतीचीही त्याने प्रशंसा केली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून 76 कसोटी, 221 एकदिवसीय सामने आणि 25 टी-20 सामने खेळणारा ब्रेट ली म्हणाला की, भारत एकप्रकारे माझे दुसरे घर आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, ‘भारत नेहमीच माझ्यासाठी दुसर्‍या घरासारखे राहिले आहे. व्यावसायिक कारकीर्द आणि निवृत्तीनंतरही मला या देशातील लोकांकडून खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. सध्याच्या साथीच्या आजारामुळे लोकांच्या वेदना पाहून दु:खी झालो आहे. यामुळे भारतातील रुग्णालयांतील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी क्रिप्टो रिलिफअंतर्गत एक बिटकॉइन देण्याचे वचन देतो.’

त्याने पुढे लिहिले, ‘आता वेळ आली आहे, एकजूट होण्याची आणि गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याची. मी सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानू इच्छितो, जे या कठीण काळात सातत्याने काम करत आहेत. सर्वांना माझे निवेदन आहे की, त्यांनी आपली काळजी घ्यावी. घरीच राहावे, हात धुत राहा आणि गरज पडल्यासच बाहेर पडा. मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. काल केलेल्या मदतीबद्दल शाब्बास पॅट कमिन्स.’

Australian Cricketer Brett Lee Donates One Bitcoin to India For Oxygen Supply IPL 2021

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती