मणिपूरमध्ये विधानसभा मतदान सुरू


विशेष प्रतिनिधी

इंफाळ : मणिपूरमध्ये सोमवारी पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांतील ३८ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिशनपूर, चुराचंदपूर आणि कांगपोकपी जिल्ह्यांचा समावेश आहे. या जागांवर १५ महिलांसह १७३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. Assembly polls begin in Manipur

यापैकी ३९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी राजेश अग्रवाल यांनी सांगितले. या टप्प्यात १२ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ५.८० लाख पुरुष तर ६.२८ लाख महिला मतदार आहेत. त्यांच्यासाठी १७२१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.अग्रवाल यांनी सांगितले की, मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले. ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार आहे. कोरोना बाधित आणि क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मतदानासाठी दुपारी ३ ते ४ वाजेची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

Assembly polls begin in Manipur

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था