ड्रग्ज माफियांविरुध्द लढणारी सुपरकॉप निवडणुकीच्या रिंगणात, मणिपूरमध्ये सर्वाधिक चर्चेची जागा


विशेष प्रतिनिधी

इंफाळ : मणिपूरमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्धच्या मोहिमेसाठी ओळखल्या जाणाºया माजी पोलीस अधिकारी थौनौजम वृंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. आपले राज्य अंमली पदार्थमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करण्याचा आपला लढा सुरू ठेवण्यासाठी आता त्या राजकीय मैदानात उतरल्या आहेत.The most talked about seat in Manipur in the Supercop election arena against drug mafia

चार वर्षांपूर्वी अनेक ड्रग-कार्टेलचा पदार्फाश केल्याच्या शौर्यसाठी त्यांना पोलीस पदक मिळाले होते. इंफाळ पूर्व जिल्ह्यातील यायस्कुल मतदारसंघातून जनता दलाच्या (युनायटेड) उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.2021 मध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदाचा राजीनामा देणाऱ्या वृंदा म्हणाल्या की, निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करण्याचे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थ दुरुपयोग यांच्या ‘दहशतवाद’पासून राज्य आणि तेथील तरुणांना मुक्त करण्याची निकड आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात राजकारणात येण्याचा विचार त्यांनी कधीच केला नसला तरी केवळ त्यांच्या प्रदेशातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.

थौनौजम वृंदा यांच्याकडे वेगळे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या सासऱ्यांनी राज्याविरुद्ध सशस्त्र चळवळीचे नेतृत्व केले होते. वृंदा यांनी मणिपूर पोलीस सेवेत अंमली पदार्थांविरुद्धच्या युद्धात उत्कृष्ट अधिकारी म्हणून काम केले. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी पोलीस दल सोडले,

ज्यांच्यावर त्यांनी ड्रग लॉर्डला मदत केल्याचा आरोप केला होता. आता, त्या भाजपचे विद्यमान आमदार आणि मणिपूरचे विद्यमान कायदा मंत्री थोकचोम सत्यब्रत सिंह यांच्या विरोधात जनता दल्याच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे.

The most talked about seat in Manipur in the Supercop election arena against drug mafia

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती