asif khan haryana murder mewat fake communal angle by Sharjeel Usmani

हरियाणातील मुस्लिम युवकाच्या मृत्यूला शरजील उस्मानीने दिला धार्मिक अँगल, म्हणाला- जय श्रीराम म्हणणारे टेररिस्ट!

हरियाणाच्या मेवात येथे झालेल्या मुस्लिम तरुणाच्या हत्येप्रकरणी शरजील उस्मानीने गरळ ओकली आहे. हरियाणा पोलिसांनी आसिफ नावाच्या तरुणाची हत्या सांप्रदायिक तणावातून झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही शरजील उस्मानीने हिंदू धर्मावर आक्षेपार्ह ट्वीट करून नवा वाद निर्माण केला आहे. शरजील उस्मानीने या घटनेसंदर्भात अनेक ट्वीट केले आहेत, तो म्हणाला की, जय श्रीराम असा जयघोष करणारेही दहशतवादीच आहेत. यानंतर आता सांप्रदायिक तेढ निर्माण करणाऱ्या शरजील उस्मानीच्या अटकेच्या मागणीने जोर धरला आहे. asif khan haryana murder mewat fake communal angle by Sharjeel Usmani


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हरियाणाच्या मेवात येथे झालेल्या मुस्लिम तरुणाच्या हत्येप्रकरणी शरजील उस्मानीने गरळ ओकली आहे. हरियाणा पोलिसांनी आसिफ नावाच्या तरुणाची हत्या सांप्रदायिक तणावातून झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही शरजील उस्मानीने हिंदू धर्मावर आक्षेपार्ह ट्वीट करून नवा वाद निर्माण केला आहे. शरजील उस्मानीने या घटनेसंदर्भात अनेक ट्वीट केले आहेत, तो म्हणाला की, जय श्रीराम असा जयघोष करणारेही दहशतवादीच आहेत. यानंतर आता सांप्रदायिक तेढ निर्माण करणाऱ्या शरजील उस्मानीच्या अटकेच्या मागणीने जोर धरला आहे.

नेमकं काय घडलं?

रविवार, 16 मे 2021 हरियाणाच्या मेवातमध्ये आसिफ नावाच्या तरुणाची हत्या झाली. आसिफ हा बॉडी बिल्डर होता. तो आपल्या दोन चुलत भावांसोबत बहिणीच्या घराहून परतत होता, त्यावेळी त्याच्यावर कथितरीत्या एका समूहाने हल्ला केला आणि मारहाणीत त्याची हत्या झाली. मिळालेल्या माहितीनुसार, गावात दोन गट आहेत, एक जाकिर जातीचा असिफ आणि गुर्जर जातीचा प्रदीप यांच्या नेतृत्वात. प्रत्येक गटात 15-20 सदस्य आहेत. 20 दिवसांपूर्वी आसिफच्या गटाने प्रदीपच्या गटातील सदस्यांना मारहाण केली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी प्रदीपच्या गटाने आसिफवर हल्ला केला. परंतु, शरजील उस्मानी मात्र नेहमीप्रमाणे धार्मिक तेढ करणारी वक्तव्ये करत आहे. वास्तव लपवून लोकांना चिथावणी देत असल्याने नेटकऱ्यांनी त्याच्या अटकेची मागणी केली आहे.

आसिफच्या मृत्यूचा अहवाल येताच काही माध्यमांनी दावा केला की, त्याला ठार मारण्यापूर्वी त्याला ‘जय श्रीराम’ बोलायला लावण्याची सक्ती करण्यात आली, यामुळे या घटनेला धार्मिक वळण लागले.

आता अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी यानेही याप्रकरणी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. परस्पर वादातून झालेल्या हत्येला धार्मिक अँगल देण्यासाठी त्याने एकापाठोपाठ एक ट्विट केले आहेत. उस्मानीने जस्टिस फॉर आसिफचा हॅशटॅग देत ट्वीट केले की, जय श्रीराम म्हणणारे हिंदू एखाद्या दहशतवाद्यापेक्षा कमी नाहीत. यासेाबतच त्याने आणखी एक ट्वीट केले की, 30 जणाच्या हिंदूंच्या समूहाने आसिफची हत्या केली.

खरं तर, घटनेतील एका साक्षीदाराने स्पष्ट केले आहे की, हल्लेखोरांपैकी तो बहुतेकांना ओळखत होता, हरियाणा पोलिसांनीही आपल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेला कोणताही धार्मिक अँगल नाही. पोलिसांच्या मते आसिफ हत्याकांडातील मुख्य आरोपी आसिफ ऊर्फ सद्दूविरुद्ध दोन आणि प्रदीप ऊर्फ पटवारीविरुद्ध पाच गुन्ह्यांची नोंद आहे.

या घटनेतील साक्षीदाराचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यात त्याने घटनेत कोणताही धार्मिक अँगल असल्याचे नाकारले आहे. आता, हरियाणा पोलिसांनीही निवेदन दिले असून तेच म्हटले आहे.

आसिफ हा सोहना येथील बसपा नेते जावेद अहमद यांचे निकटवर्तीय असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ते नूनहमधील कॉंग्रेसचे आमदार चौधरी आफताब अहमद यांचा नातेवाईक आहेत. प्रदीप हे भाजपचे स्थानिक नेते भल्ला यांचे आणि सोहनाचे आमदार कंवर संजय सिंह यांचे निकटवर्तीय आहेत.

asif khan haryana murder mewat fake communal angle by Sharjeel Usmani

महत्त्वाच्या बातम्या