Narada Case : ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या चार नेत्यांच्या जामिनाला कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थगिती

Calcutta HC STAYS order of CBI Court against TMC leaders Madan Mitra, Firhad Hakim, Subrata Mukherjee, Sovan Chatterjee in Narada case

Narada Case :  नारदा स्टिंग प्रकरणात तृणमूल नेत्यांना जामीन देण्याच्या आदेशास कोलकाता उच्च न्यायालयाने 17 मे रोजी स्थगिती दिली आहे. यापूर्वी या चार नेत्यांना नारदा प्रकरणात सीबीआयने अटक केली होती आणि त्यांना जामीनही मंजूर झाला होता. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 19 मे रोजी होणार आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआयने कोर्टात सांगितले की, ते येथे योग्य प्रकारे तपास करू शकत नाहीत, त्यांच्या तपासावर परिणाम होत आहे. Calcutta HC STAYS order of CBI Court against TMC leaders Madan Mitra, Firhad Hakim, Subrata Mukherjee, Sovan Chatterjee in Narada case


वृत्तसंस्था

कोलकाता : नारदा स्टिंग प्रकरणात तृणमूल नेत्यांना जामीन देण्याच्या आदेशास कोलकाता उच्च न्यायालयाने 17 मे रोजी स्थगिती दिली आहे. यापूर्वी या चार नेत्यांना नारदा प्रकरणात सीबीआयने अटक केली होती आणि त्यांना जामीनही मंजूर झाला होता. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 19 मे रोजी होणार आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआयने कोर्टात सांगितले की, ते येथे योग्य प्रकारे तपास करू शकत नाहीत, त्यांच्या तपासावर परिणाम होत आहे.

तृणमूल नेते नेते कोठडीत

सीबीआयने तृणमूलचे नेते फिरहद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सौवन चटर्जी यांना प्रेसिडेंसी तुरुंगात नेले. त्यांचा जामीन कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मदन मित्रा म्हणाले की, केंद्राचे दोन नेते पश्चिम बंगालमधील लोकांचा जनादेश स्वीकारू शकत नाहीत.

ममता म्हणाल्या, कोर्ट न्याय करेल

त्याचवेळी संध्याकाळी सीबीआय कार्यालयातून बाहेर पडलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एवढेच म्हणाल्या की, याप्रकरणी न्यायालय निकाल देईल. दुसरीकडे, सीबीआयने या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एजन्सीने कोर्टाला सांगितले की, त्यांना येथे काम करण्यास अडचणी येत आहे, त्याचा परिणाम तपासावर होत आहे. दरम्यान, सीबीआयने जेव्हा चारही नेत्यांना अटक केली होती, तेव्हा ममता स्वत: आपल्या समर्थकांसह कार्यालयात पोहोचल्या होत्या. तर त्याचवेळी तृणमूलच्या समर्थकांनी राजभवनाला घेराव घालत घोषणाबाजी केली होती. कायदेशीर तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न तृणमूलकडून झाल्याचा प्रकार काल अवघ्या देशाने पाहिला.

Calcutta HC STAYS order of CBI Court against TMC leaders Madan Mitra, Firhad Hakim, Subrata Mukherjee, Sovan Chatterjee in Narada case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात