सीबीआयने अटक केलेल्या मदन मित्रा, सोवन चटर्जींच्या छातीत दुखले, कोलकात्यातील हॉस्पिटलमध्ये केले दाखल


वृत्तसंस्था

कोलकाता – नारदा घोटाळ्यात सीबीआयने अटक केलेले तृणमूळ काँग्रेसचे नेते मदन मित्रा आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांनी छातीत दुखायला लागल्याची तक्रार केली आहे. पोलीसांनी ताबडतोब या दोघांना कोलकात्याच्या एसएसकेएम हॉस्पिटलच्या वुडबर्न ब्लॉकमध्ये दाखल केले आहे. TMC MLA Madan Mitra and Former Minister Sovhan Chatterjee admitted to SSKM hospital’s Woodburn block on complaint of breathing problem at around 3 am

नारदा घोटाळ्यात काल दिवसभराच्या नाट्यात सीबीआयने तृणमूळचे मंत्री फिरहाद हकीम, सुब्रता मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांना अटक केली. स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. पण कोलकाता उच्च न्यायालयाने चौघांचा जामीन फेटाळला. त्यामुळे चौघेही नेते सीबीआयच्याच ताब्यात राहिले.



आज पहाटे ३.०० वाजता मदन मित्रा आणि सोव्हन चटर्जी यांनी एकाच वेळी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे पोलीसांनी तातडीने हालचाली करून या दोघांना कोलकात्याच्या एसएसकेएम हॉस्पिटलच्या वुडबर्न ब्लॉकमध्ये दाखल केले आहे. त्यानंतर पोलीसांनी सुब्रता मुखर्जी यांनाही पोलीसांनी याच हॉस्पिटलमध्ये आणले.

नारद स्टिंग ऑपरेशनमधील गैरव्यवहार हा मार्च २०१६ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळचा आहे. नारद न्यूज पोर्टलचे ‘सीईओ’ मॅथ्यू सॅम्युअल यांनी निवडणुकीआधी व्हिडिओ प्रसारित करीत बंगालच्या राजकारणात हादरे दिले होते. या विडिओमध्ये ते एका कंपनीचे प्रतिनिधी म्हणून वावरले होते. तृणमूल काँग्रेसचे ७ खासदार, ३ मंत्री आणि कोलकता महापालिकेचे महापौर सोवन चॅटर्जी यांना कामाच्या बदल्यात त्यांनी मोठी रक्कम दिली होती.

भ्रष्टाचाराचे हे प्रकरण सीबीआयपर्यंत पोचू नये, यासाठी तृणमूल काँग्रेसने जंग जंग पछाडले. हे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोपही केला, पण कोलकाता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारविरोधात निकाल दिला. आता त्या आधारेच सीबीआयची कारवाई सुरू आहे. तृणमूळ काँग्रेसच्या ४ नेत्यांना झालेली अटक त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे.

TMC MLA Madan Mitra and Former Minister Sovhan Chatterjee admitted to SSKM hospital’s Woodburn block on complaint of breathing problem at around 3 am

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात