West Bengal TMC violence : घाला रे हाकारे… पिटा रे डांगोरे… बिळात लपलेले लिबरल्स शोधा रे…!!


भारतातल्या लिबरल्स आणि बॉलिवूडी सेलिब्रिटींची जातकुळी मुस्लीम फुटीरतावादी विचारसरणीशी नाते सांगणारी आहे. करदार स्टुडिओ, अब्दुर रशीद करदार यांनी ती पोसली आहे. म्हणूनच आजचे त्यांचे वारस बंगालमधील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत.


घाला रे हाकारे… पिटा रे डांगोरे… बिळात लपलेले लिबरल्स शोधा रे…!!, हे म्हणायची वेळ आता आली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसच्या विजयोन्मादात ममता बॅनर्जींचे गुंड आणि कार्यकर्ते एवढा हिंसाचाराचा धुडगूस घालताहेत, पण त्याचा निषेध करण्यासाठी किंवा लोकशाही धोक्यात आली आहे… अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, अशा धोशा लावण्यासाठी कोणी लिबरल किंवा बॉलिवूड सेलिब्रिटी पुढे आलेला दिसत नाही. West Bengal TMC violence, where are liberals, bollywood celebrities and award wapasi gang?

कुठे आहेत… स्वरा भास्कर, महेश भट, आलिया भट, नवाजुद्दीन सिद्दीकी, अमिर खान आणि बाकीचे ऍवॉर्ड वापसी सेलिब्रिटी…?? त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्यात की तोंडे शिवलीत… की ट्विटरने त्यांची अकांउट सस्पेंड केलीत… त्यामुळे त्यांनी अजून तृणमूळ काँग्रेसने बंगालमध्ये माजविलेल्या हिंसाचारावर तोंड उघडलेले नाही.

हिंसाचार वाईटच, मग तो कोणीही केलेला असो. लोकशाहीत मत – मतांतरांना स्थान आहे. मतभेदांना स्थान आहे. मत स्वातंत्र्य आहे. पण कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला स्थान नाही. ही शुध्द आणि स्पष्ट भूमिका लिबरल या मूळ राजकीय – सामाजिक – सांस्कृतिक संकल्पनेत येते.

पण आपल्याकडचे लिबरल्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटी हे “सिलेक्टिव्ह लिबरल” आहेत. भाजपने केलेल्या हिंसाचाराचे असलेले – नसलेले “कुसळ” त्यांच्या डोळ्यात आणि डोक्यात सलते. पण आता ममतांच्या तृणमूळ काँग्रेसच्या गुंडांनी माजविलेल्या हिंसाचाराचे मोठ्ठेच्या मोठ्ठे “मुसळ” आपल्याकडच्या लिबरल्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना दिसत नाही. म्हणूनच ते बंगालमधल्या हिंसाचाराचा निषेध करायला पुढे आलेले नाहीत किंवा येत नाहीत. ते आता आपापल्या धर्मनिरपेक्षतेच्या सुरक्षित बिळात लपून बसले आहेत.

तृणमूळ काँग्रेसची दुहेरी स्ट्रॅटेजी

बंगालमधल्या हिंसाचारात तृणमूळ काँग्रेसने देखील दुहेरी स्ट्रॅटेजी अवलंबिलेली आहे. त्यांचे गुंड मुस्लीम बहुल ७ जिल्ह्यांमध्ये हिंसक कारवाया करीत आहेत. भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ठरवून आणि वेचून टार्गेट करीत आहेत. त्याच वेळी तृणमूळ काँग्रेसचे मीडिया हॅंडलर्स आणि सोशल मीडिया हॅंडलर्स हे फेक न्यूज पसरविण्यात मग्न आहेत. हिंसाचार, लूटालूटीचे विडिओ व्हायरल होत आहेत. त्यांना खोटे ठरविण्याचा उद्योग त्यांनी चालविला आहे.

बॉलिवूडचे पूर्वसूरी कोण…

बंगालमधल्या हिंसाचारी तुलना फक्त जे. पी. ऩड्डांनीच फाळणीच्या वेळच्या हिंसाचाराशी केली आहे, असे नाही. तर त्यावेळची छायाचित्रे आणि आत्ताची छायाचित्रे यांची साधारण तुलना केली तरी ते सिध्द होते.

१६ ऑगस्ट १९४६ च्या डायरेक्ट ऍक्शनमध्ये कोलकात्यात मुस्लीम लीगच्या गुंडांनी ५ हजार हिंदूंचा नरसंहार केला. त्याचे गोडवे आजच्या पाकिस्तानात गाईले जातात. डायरेक्ट ऍक्शन हा बॅ. महंमद अली जीनांच्या राजकीय कर्तृत्वाचा महत्त्वाचा भाग मानण्यात येतो. त्यावेळी देखील कम्युनिस्ट आणि त्यावेळचे लिबरल्स हे जीनांचे छुपे समर्थक होते. डायरेक्ट ऍक्शनच्या घोषणेला स्वा. सावरकारांच्या आणि श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वाखाली फक्त हिंदू महासभेने प्रखर विरोध केला होता. त्यावेळी आजच्या लिबरल्सचे आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे वैचारिक पूर्वज बॅ. जीनांच्या बाजूने उभे होते. करदार स्टुडिओच्या कलाकारांचा आणि अब्दुर रशीद करदारांचा इतिहास जरा ताडून पाहा. खायचे आणि कमवायचे बॉलिवूडमध्ये आणि गोडवे गाय़चे बॅ. जीनांचे, असे उद्योग त्यांनी केले आहेत.

आजचे महेश भट, स्वरा भास्कर, आलिया भट, अमिर खान हे त्या करदारांचे बॉलिवूडी वारस आहेत. म्हणूनच हे सगळे आपापल्या बिळात लपून बसले आहेत. बंगालमधल्या हिंसाचाराचा ते निषेध करत नाहीएत. हे समजून घेतले पाहिजे.

West Bengal TMC violence, where are liberals, bollywood celebrities and award wapasi gang?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात